Uday Samant  Saamtv
महाराष्ट्र

Uday Samant Boat Accident: मोठी बातमी! उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या बोटीला अपघात; चालकाचे नियंत्रण सुटले अन् थेट..

Uday Samant News: चालकाचे बोटीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. ज्यामुळे त्यांची बोट जेटीच्या खांबांना जावून आदळली.

Gangappa Pujari

सचिन कदम, प्रतिनिधी...

Raigad News: उद्योगमंत्री तथा रायगडचे पालकमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्या स्पीड बोटीला मांडवा येथे अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. चालकाचे बोटीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. ज्यामुळे त्यांची बोट जेटीच्या खांबांना जावून आदळली. या दुर्घटनेत कोणतीही मोठी दुर्घटना घडली नसल्याचे सांगण्यात आले आहे. (Latest Marathi News)

याबाबत अधिक माहिती अशी की, उद्योगमंत्री उदय सामंत आज अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयात शिवराज्याभिषेक सोहळा नियोजनासंदर्भातील बैठकीसाठी गेट वे ऑफ इंडियावरून मांडवा येथे स्पीड बोटीने निघाले होते. यावेळी त्यांच्यासोबत छत्रपती संभाजीराजेही (Chhatrapati Sambhajiraje) होते. मांडवा जेट्टीजवळ पोहोचल्यावर चालकाने जेटीवर लावण्यासाठी बोट वळवली. मात्र यावेळी चालकाचे बोटीवरील नियंत्रण सुटले आणि बोट जेटीच्या खालील खांबाना जाऊन धडकली.

दरम्यान, सुदैवाने बोटीचा वेग कमी असल्याने यावेळी मोठी दुर्घटना घडली नाही. नंतर मात्र बोट चालकाने बोटीवर नियंत्रण मिळवून बोट तरंगत्या तराफ्यावर सुखरूप लावली. तेव्हा सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. दरम्यान, याआधी सुद्धा उद्योग मंत्री उदय सामंत यांची बोट भर समुद्रात तांत्रिक बिघाडामुळे बंद पडली होती. त्यावेळी तटरक्षक दलाने रेस्क्यू ॲापरेशन करत भर समुद्रातून सुटका केली होती. त्यानंतर आज मांडवा जेट्टीजवळ बोटीला अपघात झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

धमकीनंतरही बिग बींचा रविवारचा नियम कायम; चाहत्यांना भेटण्यासाठी शोधली भन्नाट शक्कल

Vastu Tips For Wall Clock: घरात घड्याळ कुठे लावावे? वास्तुशास्त्रानुसार योग्य दिशा कोणती?

Stylish Tops For Women: जीन्सवर कोणत्या प्रकारचे टॉप्स घालावेत? पाहा लेटेस्ट कलेक्शन

Jalgaon Firing: दुचाकीवरून आलेल्या तीन हल्लेखोरांकडून 25 वर्षीय तरुणावर बेछुट गोळीबार, भुसावळ हादरलं!

Co-Ords Sets Dress For Women: दिवाळीनिमित्त महिलांसाठी को-ऑर्ड सेट ड्रेसचे लेटेस्ट 5 पॅटर्न्स

SCROLL FOR NEXT