Shivsena leader Shambhuraj Desai threatens Kunal Kamra Saam Tv News
महाराष्ट्र

Shambhuraj Desai : तो ज्या बिळात लपून बसलेला असेल, त्याला तिथून...; शिंदेंच्या नेत्याचा कुणाल कामराला इशारा

Shambhuraj Desai on Kunal Kamra : कुणाल कामराने केलेल्या कवितेमुळे राज्यातील शिवसैनिक चांगलेच संतापले आहेत. त्यानंतर आता मंत्री शंभूराज देसाई यांनी देखील त्याला इशारा दिला आहे.

Prashant Patil

मु्ंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील विडंबन पद्धतीने गाणं गायल्यामुळे प्रसिद्ध कॉमेडियन कुणाल कामरा अडचणीत सापडला आहे. एकीकडे पोलिसांनी त्याला हजर राहण्याचं समन्स बजावलं आहे. तर दुसरीकडे, शिवसैनिकांचे त्याला धमक्यांचे फोन येत आहे. आता महाराष्ट्र सरकारमधील मंत्री तथा शिवसेना नेते शंभूराज देसाई यांनी कुणाल कामरा याला इशारा दिला आहे. शंभूराज देसाई म्हणाले की, कुणाल कामरा कोणत्या बिळात लपलेला आहे आणि त्याला कुठे भेटायचं ते फक्त सांगा. उपमुख्यमंत्री शिंदे यांनीच सगळ्यांना थांबण्यास सांगितलं आहे, अन्यथा शिवसैनिक त्याला रस्त्यावर आणतील आणि धडा शिकवतील.

शंभूराज देसाई पुढे म्हणाले की, कुणाल कामराने मर्यादांचं उल्लंघन केलंय. पाणी आता डोक्यावरुन गेलंय, आता त्याता धडा शिकवण्याची वेळ आलीय. तो ज्या बिळात लपून बसलेला असेल त्याला तिथून काढून रस्त्यावर आणू, आणि त्याला थर्ड डिग्री देण्याची गरज आहे, असं देसाई यांनी म्हटलं आहे.

शिवसेना समर्थकांनी दिली होती धमकी

शंभूराज देसाई यांच्याआधी एका शिवसेना कार्यकर्त्याने देखील फोनवरुन कुणाल कामराला धमकी दिली होती. त्याची ५३ सेकंदाची ऑडिओ क्लिप समोर आली होती. त्या क्लिपमध्ये शिवसेना कार्यकर्ता कुणाल कामराला शिवीगाळ करत होता, आणि म्हणत होता की, तुझी पण तुझ्या क्लबसारखे हाल करु.

दुसरीकडे, खार पोलीस देखील त्याच्या शोधात आहेत. त्यांनी कुणाल कामराला दुसऱ्यांदा समन्स बजावलं आहे. ३१ मार्चला त्याला चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं आहे. खार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कामरा हा त्याच्या वकिलामार्फत त्यांच्या संपर्कात आहे. पहिल्यांदा समन्स बजावल्यानंतर कुणाल कामराने २ एप्रिलपर्यंत मुदत मागितली होती. परंतु, पोलिसांनी त्याला साफ नकार दिला. त्यानंतर पोलिसांनी त्याला ३१ मार्चला सकाळी ११ वाजता खार पोलीस स्टेशनमध्ये हजर राहण्यास सांगितलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video : त्र्यंबकेश्वर मंदिरात परप्रांतीय भाविकांचा राडा, दरवाजावर लाथा मारत गोंधळ घातला

Watch Video : राहुल गांधींचा व्होट चोरीवरुन निवडणूक आयोगावर पुन्हा निशाणा!

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Vivo T4 Pro भारतात लवकरच होणार लाँच, ५०MP कॅमेरा अन् खास फीचर्स, किंमत किती?

Weather Update : पावसाचा जोर वाढला! मुंबई, ठाणे, पुण्यासह अनेक जिल्ह्यांना अलर्ट जाहीर, वाचा आजचा हवामानाचा अंदाज

SCROLL FOR NEXT