Sambhajiraje News, Sanjay Pawar News
Sambhajiraje News, Sanjay Pawar News Saam Tv
महाराष्ट्र

'संभाजीराजे हे आमचे छत्रपती आहेत, मात्र...'; शिवेसेना नेते संजय पवारांचा इशारा

संभाजी थोरात

कोल्हापूर : राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार संजय पवार (Sanjay Pawar) पराभूत झाले होते. त्यानंतर संभाजीराजे छत्रपती ( Sambhaji Raje Chhatrapati ) यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली होती. आता संभाजीराजे छत्रपतींच्या त्या टीकेवर आता शिवसेनेचे पराभूत उमेदवार , शिवसेना नेते संजय पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. 'संभाजीराजे हे आमचे छत्रपती आहेत. मात्र त्यांची शिवसेनेवरची (Shivsena) टीका खपवून घेतली जाणार नाही', अशा शब्दात संजय पवारांनी संभाजीराजेंना इशारा दिला आहे. (Maharashtra Politics News In Marathi)

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी संभाजीराजे छत्रपतींनी जोरदार प्रयत्न केले होते. महाविकास आघाडी आणि शिवसेनेकडून पाठिंब्याची विनंती केली होती. मात्र, शिवसेनेने संभाजीराजे छत्रपतींना पक्ष प्रवेशाची ऑफर दिली होती. मात्र, संभाजीराजेंनी शिवसेनेची ऑफर नाकारली होती. त्यानंतर शिवसेनेने सहाव्या जागेसाठी कोल्हापूरच्या संजय पवार यांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र,राज्यसभेच्या निवडणुकीत शिवसेना नेते संजय पवारांचा पराभव झाला. राज्यसभेच्या सहाव्या जागेवर संजय पवारांचा पराभव झाल्यावर संभाजीराजे छत्रपतींनी शिवसेनेवर जोरदार टीका केली होती. त्यावर संजय पवारांनी संभाजीराजेंना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. (Sanjay Pawar News)

संजय पवार म्हणाले, 'संभाजीराजे हे आमचे छत्रपती आहेत. मात्र त्यांची शिवसेनेवरची टीका खपवून घेतली जाणार नाही. मराठा मावळा हरल्याचे पोस्टर लावणे हे अत्यंत दुर्दैवी आहे. शिवसेनेकडे तुम्ही मते मागायला आला होता. शिवसेनेचे वाघ हे जंगलातील आहेत, सर्कशीतील नाही. राज्यसभा निवडणुकीत कुठे दगाफटका झाला, त्याचा शोध वरिष्ठ घेत आहेत'. त्यानंतर राज्यसभेत पराभूत झाल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी फोन करून आधार दिल्याचे संजय पवारांनी सांगितले. तसेच इथून पुढे शिवसेनेचे कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार काम सुरू ठेवणार असल्याचेही संजय पवारांनी सांगितले.

संभाजीराजेंनी ट्वीट करत शिवसेनेवर साधला होता निशाणा

वाघाचा कलभूत दिसे वाघा ऐसा । परि नाहीं दशा साच अंगीं ।।

तुका म्हणे करीं लटिक्याचा सांठा । फजित तो खोटा शीघ्र होय ।।

या ट्विटच्या माध्यमातून छत्रपती संभाजीराजेंनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेवर टीका केली होती. वाघाचं कातडं पांघरलं म्हणून वाघ होता येत नाही, असा या ट्विटचा आशय होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: मी दिलेलं चॅलेंज स्वीकारलं नाही; श्रीकांत शिंदेंनी आदित्य ठाकरेंना डिवचलं

Who is Shashank Rao: बेस्ट स्ट्राईक, ऑटो युनियनचा झंझावती आवाज शशांक राव आहेत तरी कोण?

Maharashtra Election: राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी येणार एकाच मंचावर? शिवाजी पार्कात होणार सभा

Bihar Wedding Viral News : अजब-गजब प्रेम कहाणी: विधूर जावयासोबत सासऱ्यानेच लावलं बायकोचं लग्न

May Month Horoscope: या राशींसाठी येणारे 30 दिवस ठरतील वरदान, मेष राशीत मंगळाचा प्रवेश ठरणार लाभदायक

SCROLL FOR NEXT