Dr Neelam gorhe and cm Eknath Shinde
Dr Neelam gorhe and cm Eknath Shinde saam tv
महाराष्ट्र

मंत्रालयात धक्कादायक प्रकार, अवर सचिवाने केला वरिष्ठ महिला अधिकाऱ्याचा विनयभंग, गोऱ्हेंची कारवाईची मागणी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मी पुराणीक

मुंबई : मंत्रालयात धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. मंत्रालयात इतर मागास बहुजन कल्याण विभागात अवर सचिव स्तरावर असणाऱ्या अधिकाऱ्यांनी उपसंचालक पदावर असलेल्या महिलेचा विनयभंग केला. 'मला बरे वाटत नाही, मी बोअर झालो आहे. मला जरा गाणे म्हणून दाखव, अशा प्रकारचे हीन वक्तव्य एका मंत्र्यांच्या अवर सचिवांनी केलं आहे. त्याच ठिकाणी याच विभागाचे उपसचिव देखील उपस्थित होते. त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. (female officer molested in mumbai mantralaya dr neelam gorhe on action mode)

नीलम गोऱ्हे (Neelam gorhe) यांनी निवेदनात म्हटलंय, 18 ऑक्टोबर 2022 च्या घटनेमध्ये महिला अधिकाऱ्यांनी स्वतःचा लेखी तक्रार अर्ज संबंधित विभागाच्या मंत्र्यांकडे दिलेला आहे.तसेच त्यांच्या सचिवांनादेखील दिलेला आहे. त्यांना त्यांच्याकडून याबाबत कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने माझ्याकडे ही माहिती आली आहे. संबंधित महिला अधिकाऱ्यांकडून मी माहिती घेतली आहे. घडलेल्या प्रकाराबाबत त्यांनी मला सांगितलं आहे.

ही घटना घडल्यावर तातडीनं मंत्री आणि अधिकाऱ्यांकडे सुद्धा त्यांनी तक्रार नोंदवलेली आहे. त्या ठिकाणी अनेक कार्यालयीन कामासाठी महिला येतात.मला असं वाटतं की,या दोघांना म्हणजे अवर सचिव आणि उपसचिव आहेत, त्यांना या कार्यातून तात्पुरते कार्यमुक्त केलं पाहिजे.यामध्ये स्वतः मुख्यमंत्री (eknath shinde) ,उपमुख्यमंत्री,मुख्य सचिव यांनी याबाबत चौकशी करावी.

सदर चौकशी करून या महिलेला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून या दोघांनाही तातडीनं त्यांच्या जबाबदारीतून बाजूला ठेवावं. नाहीतर चौकशी नि:पक्षपाती होणार नाही. अशा प्रकारची वक्तव्य जर मंत्रालयात होत असतील आणि याबाबत संभाजीनगरला 20ऑक्टोबरला पत्रकार परिषद झाली होती. मात्र इतके दिवस होऊन सुद्धा कोणतीच दखल घेतली जात नसेल तर ही अतिशय गंभीर बाब आहे. सरकारने या घटनेकडे तातडीनं लक्ष द्यावं.त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी.

Edited By - Naresh Shende

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Custard Apple Benefits : डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी सीताफळ उपयुक्त; जाणून घ्या आरोग्यदायी फायदे

Special Report : बारामतीत मडकं फोडणारा "तो" कार्यकर्ता कोण?

Special Report : तुम्हारे पास क्या है? कोल्हेंच्या डायलॉगबाजीने अहमदनगरात वातावरण तापलं

Mithila Palkar : ‘वेब क्वीन’ मिथिलाचा अनोखा साज, लूकने वेधले लक्ष

Nashik Lok Sabha: शांतीगिरी महाराज निवडणूक लढण्यावर ठाम, नाशिकमध्ये महायुतीला घाम! गोडसेंच्या अडचणी वाढणार?

SCROLL FOR NEXT