Vande Bharat Train Accident : वंदे भारत ट्रेनला पुन्हा अपघात; आता गाईला धडकली

वंदे भारत ट्रेन मुंबई सेंट्रलहून गुजरातच्या गांधीनगरच्या दिशेनं रवाना झाली होती.
vande Bharat Train Accident
vande Bharat Train Accidentsaam tv

वलसाद : मुंबई-गांधीनगर वंदे भारत ट्रेनला मुंबई सेंट्रल विभागाच्या अतुल जवळ आज शनिवारी सकाळी अपघात झाला. रेल्वे रुळावर गाय आडवी आल्याने हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. ही ट्रेन मुंबई सेंट्रलहून गुजरातच्या गांधीनगरच्या दिशेनं रवाना झाली होती. सकाळी सव्वा आठ वाजताच्या सुमरास या ट्रेनला अपघात झाला. त्यामुळे वंदे भारत ट्रेन पंधरा मिनिटं उशिराने धावली. (Vande Bharat train accident occurred again because of cattle runover)

भारतीय रेल्वे विभागाने दिलेल्या माहितीनुसार, वंदे भारत ट्रेनचा मुंबई सेंट्रेल ते गांधीनगर असा प्रवास सुरु झाला असताना गाय आडवी आल्याने हा अपघात झाला. या अपघातामुळं ट्रेनच्या प्रवासाला पंधरा मिनिट उशीर झाला. या अपघातामुळं ट्रेनच्या पहिल्या डब्यात असलेल्या नोझ कोन कव्हरचं नुकसान झालं आहे.गायीची धडक लागल्याने हा अपघात झाल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

vande Bharat Train Accident
Eknath Shinde : महाराष्ट्रातील आदिवासी समाज प्रकाशझोतात येणार, तब्बल 11 हजार 199 कोटींचा निधी मिळणार

7 ऑक्टोबरला अशाच एका अपघाताची नोंद करण्यात आलीय. मुंबई सेंट्रल ते गुजरात गांधीनगरच्या प्रवासादरम्यान वंदे भारत ट्रेनला वाटवा आणि मनीनगर स्थानकादरम्यान अपघात झाला होता. रेल्वे रुळावर म्हैस आडवी आल्याने हा अपघात झाला होता. या अपघातात ट्रेनचं फारसं नुकसानं झालं नव्हतं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com