Eknath Shinde Latest News, Political Crisis in Maharashtra  Saam TV
महाराष्ट्र

Breaking : एकनाथ शिंदे थोड्याच वेळात मोठा निर्णय घेण्याची शक्यता

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडाचं निशाण फडकावल्यामुळं राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केल्यामुळं शिवसेनेच्या गोटात खळबळ उडाली आहे. शिंदे त्यांच्या जवळपास ४० समर्थक आमदारांसह गुवाहाटीत वास्तव्यास आहेत. त्यामुळे शिवसेना आणि राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आला आहे. २४ तासांच्या आत मुंबईत परत या, समोर बसून चर्चा करता येईल, असा प्रस्ताव एकनाथ शिंदे गटाला दिला होता. मात्र, आता राऊत यांच्या प्रस्तावावर चर्चा करण्याची वेळ निघून गेली असल्याचे शिंदे गटाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, थोड्याच वेळात आमदारांशी बोलून एकनाथ शिंदे पुढील निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली. (Eknath Shinde Latest News)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav Thackeray) यांनी काल पक्षाच्या आमदारांसह एकनाथ शिंदेसोबत गेलेल्या बंडखोर आमदारांनाही संबोधनातून भावनिक आवाहन केले. त्यानंतर आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा बंडखोर आमदारांना आवाहन केलं आहे. संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटातील २१ आमदार अजूनही आमच्या संपर्कात असल्याचा दावा केला आहे. दुसरीकडे

तसंच आमदारांनी 24 तासांच्या आत मुंबईत यावं, आपण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करू आणि महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा विचार करू असा प्रस्तावही त्यांनी ठेवला. मात्र, एकनाथ शिंदे यांनी राऊतांच्या प्रस्तावावर मोठी प्रतिक्रिया दिलीय.

मिळालेल्या माहितीनुसार, संजय राऊत यांच्या प्रस्तावावर विचार करण्याची वेळ निघून गेलीय. शिवसेनेचे आमदार ४० हून अधिक आमदार आमच्यासोबत आहेत, असा दावा शिंदे यांनी केला आहे. तसंच पुढच्या काही वेळात बैठक घेऊन यावर आमदारांशी बोलून निर्णय घेणार. राऊत यांच्या प्रस्तावावर एकनाथ शिंदे थोड्याच वेळात व्हिडिओ प्रतिक्रिया देणार असल्याचं समजते.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain: मुंबईसह ठाण्यात तुफान पाऊस, राज्यासाठी पुढचे ५ दिवस महत्वाचे; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

कराचीत ५ मजली इमारत पत्त्यासारखी कोसळली, २७ जणांचा मृत्यू

Maharashtra Live News Update : नाशिक जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपलं

Chocolate Waffle Recipe : बिस्किटांपासून बनवा चॉकलेट वॉफल, लहान मुलांचा आवडता पदार्थ १० मिनिटांत तयार

10 Hour Work Rule: सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय! १० तासांची शिफ्ट, ५ दिवसांचा आठवडा

SCROLL FOR NEXT