Deepali Sayed Latest News, Raj Thackeray Ayodhya Visit News Saam Tv
महाराष्ट्र

'यांचे राजकारण दोन तालुक्यांचे', दिपाली सय्यद यांचा राज ठाकरेंना टोला

शिवसेनेनं राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावरुन टीकेची झोड उठवली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मनसे मेळाव्यात मशिंदीवरील भोंग्यांबाबत आक्रमक भूमिका घेतल्याने राजकीय वातावरण चांगलंच तापलं. राज यांच्यावर शिवसेनेसह विरोधकांनी टीकेची झोड उठवली. हिंदुत्वाचा (Hinduism) मुद्दा केंद्रस्थानी ठेवून राज यांची सेना आता ५ जूनला अयोध्येला जाणार आहे. यावरुन राजकीय चर्चांणा उधाण आलं असून शिवसेनेनं राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावर सवालही उपस्थित केले आहे. अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या दिपाली सय्यद (Deepali Sayed) यांनी राज ठाकरेंवर टीका केलीय. ज्यांचे राजकारण दोन तालुक्यांचे ते शिवसेनेला नोटाचे राजकारण काय शिकवणार ? जर भिती वाटत असेल तर अयोध्येत शिवसेनेचा (Shivsena) धाक आजही कायम आहे. असं ट्विट करत दिपाली यांनी राज यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.

दिपाली सय्यद यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटलंय, ज्यांचे राजकारण दोन तालुक्यांचे ते शिवसेनेला नोटा चे राजकारण काय शिकवणार,जर भिती वाटत असेल तर अयोध्येत शिवसेनेचा धाक आजही कायम आहे.आदित्य साहेबांना विनंती करून सोबत येऊ शकता,माफी मागण्याची गरज लागणार नाही.जय श्रीराम. तसंच दिपाली यांनी पत्रकार परिषद घेवून अनेक मुद्द्यांवर भाष्य केलंय.

यावेळी माध्यमांशी बोलताना दिपाली म्हणाल्या, राज ठाकरे यांचे दोन तालुक्या पुरतेच आहे.शिवसेनेचा आजही दबदबा आहे. राज ठाकरे पाच तारखेला अयोध्येला जात आहेत. त्यांनी क्षमा मागितली तर त्यांना जाऊ दिले जाईल. जर राज ठाकरे तिथे गेले आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर आघात झाला, तर तुम्ही जबाबदार घेणार आहात का ? काही वर्षांपूर्वी तुम्ही यूपीच्या लोकांना बाहेर काढलं. तुम्ही आदित्य ठाकरे यांचा हात पकडा आणि जा.कांचनगिरी म्हटल्या प्रमाणे खेद व्यक्त केलं, मग ते राज ठाकरे कुठे गेले आहेत ? मनसे ही भाजपची टीम आहे. असं म्हणत दिपाली यांनी मनसेवर हल्लाबोल केला आहे.

तसंच माध्यमांशी बोलनाता दिपाली पुढं म्हणाल्या, महाविकास आघाडीने ज्या पद्धतीने काम केले, हे लोकांनी पाहिले आहे. महाविकास आघाडी कुठंतरी चांगले काम करतंय म्हणून हे सर्व सुरू आहे. मी हिंदू आहे म्हणून का सांगावं लागतं. विरोधक बरळत असतात.मी वेगवेगळ्या नावाने कधीही निवडणूक लढली नाही. माझे आधार कार्ड देखील सय्यद आहे. केतकी चितळेवरही दिपाली यांनी टीका केली. केतकी अशी व्यक्ती आहे की, तिला काही तरी आजारपण आहे. कलाकार म्हणून तिने वक्तव्य केले. केतकीला शिक्षा झाली हे बरोबर आहे. असंही दिपाली म्हणाल्या.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT