"बाळासाहेब ठाकरे यांचे मावळे असे असूच शकत नाहीत"; ज्येष्ठ अभिनेत्रीचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर टीका केलीय.
CM Uddhav Thackeray
CM Uddhav ThackeraySaam Tv
Published On

पुणे : अभिनेत्री उषा चव्हाण (Usha Chavan) यांच्या शेतजमीनीत घुसून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी बेकायदेशीरपणे खोदाई केलीय. ही धक्कादायक घटना रविवारी दुपारी सव्वा एक वाजण्याच्या सुमारास जांभळी येथे घडली. याप्रकरणी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यासह दोघांविरुद्ध उत्तमनगर (police fir filed) पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आलीय. तसंच राजेंद्र धनकुडे याच्यासह जेसीबी चालकाविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साताऱ्यातील ट्रेझर पार्क येथे राहणाऱ्या हृदयनाथ दत्तात्रय कडू यांनी उत्तमनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. दरम्यान, उषा चव्हाण यांनी याप्रकाराबात थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav Thackeray) यांना पत्र पाठवलं आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे मावळे असे असूच शकत नाहीत. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नपुर्ती राज्यात एखाद्याचे शेतच सुरक्षीत राहत नसेल, तर घर तरी कसे सुरक्षीत राहील ? याची काळजी वाटते. असा थेट सवाल चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे केला आहे.

CM Uddhav Thackeray
अर्ध्यावरती डाव सोडला...'या' संघाचा कर्णधारच परतला मायदेशात, कारण...

उषा चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं की, बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नपुर्ती राज्यात एखाद्याचे शेतच सुरक्षीत राहत नसेल, तर घर तरी कसे सुरक्षीत राहील, याची काळजी वाटते. बाळासाहेबांनी नेहमी महिलांचा आदर केला आहे. महिलांना त्रास होऊ नये,याची ते पुरेपुर काळजी घेत होते. त्यातही माझ्यासारख्या बाळासाहेबांच्या स्नेहपरिवारातील अभिनेत्रीला असा त्रास दिला जात आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे मावळे असे असूच शकत नाहीत.'अशा शब्दात उषा चव्हाण यांनी पत्राद्वारे आवाज उठविला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हृदयनाथ कडू हे ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांचे पुत्र आहेत.उषा चव्हाण यांनी 1999 मध्ये हवेली तालुक्‍यातील जांभळी येथे गट क्रमांक 335 मध्ये साडे सहा एकर जागा सीताराम पवार यांच्याकडून खरेदी केली होती.संबंधित जागेवर कडू यांच्या कुटुंबातील सदस्य वेळोवेळी पाहणी करुन देखभाल करीत असत.त्यांनी जांभळी येथे राहणारे धर्मराज शिवाजी गडदे यांना त्यांच्या जागेतील माळरान गायी परवानगी दिली आहे. शिवसेनेचे उपशहर प्रमुख राजेंद्र धनकुडे यांनी कडू यांच्याकडे त्यांच्या जागेतून जलवाहिनी टाकण्यासाठी चर खोदण्याबाबत विचारणा केली होती. मात्र कडू यांनी धनकुडे यांच्या मागणीला विरोध करुन जलवाहिनी रस्त्याच्याकडेने करण्याबाबत सांगितले. त्यानंतर गडदे यांनी रविवारी दुपारी कडू यांना फोन केला. त्यांच्या जागेत जेसीबी आणण्यात आला असून खोदाईचे काम सुरु असल्याची माहिती फोनवरुन दिली.

CM Uddhav Thackeray
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता राजीनामा द्यावा”; चंद्रकांत पाटलांची मागणी

त्यानंतर कडू त्यांच्या कुटुंबासह घटनास्थळी गेले.तेव्हात्यांना त्यांच्या जमीनीमध्ये खोदकाम केल्याचे निदर्शनास आले.त्यांनी याबाबत तत्काळ उत्तमनगर पोलिसांना खबर दिली. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केल्यावर त्यांच्या जमिनीत 400 फुट लांब,चार फुट रुंद व दोन फुट खोल चर केली असल्याचे आढळले. तसेच त्यांनी वहिवाटीसाठी गेलेला रस्ता उकरुन बंद केला आहे, याबरोबरच त्यांच्या जागेतील दगडाच्या ताली,लोखंडी तारेके कुंपण,सिमेंट व लोखंडाच्या खांबांची तोडफोड केल्याचे आढळून आले.धनकुडे यांनी फिर्यादी यांची कुठलीही परवानगी न घेता,त्यांच्या जागेत घुसून चर खोदण्याचे काम केले आहे.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com