deepak kesarkar and narayan rane saam tv
महाराष्ट्र

Narayan Rane: ...म्हणून राणे लोटांगण घालत भाजपात गेले : दीपक केसरकर

साम न्यूज नेटवर्क

- विनायक वंजारे

सिंधुदुर्ग : ज्या कुटुंबामुळे मुख्यमंत्री झालात त्यांच्या बद्दल बोलताना जिभ थोडी तरी चाचरली पाहिजे हाेती. खरं तर तुम्हांला साधं संसदेतही बोलता येत नाही अशी टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर माजी गृहमंत्री दीपक केसरकर (deepak kesarkar) यांनी केली. (narayan rane latest marathi news)

केसरकर म्हणाले राणेंना (narayan rane) संसदेत साधं बोलता येत नाही. कोकणातील (kokan) लोकप्रतिनिधींनी संसद गाजवली मात्र राणे साधं परफॉर्मन्स दाखवता आलेला नाही. सुशांत सिंग (sushant singh) प्रकरण हे सीबीआयकडे आहे. ती तुमचीच तपास यंत्रणा आहे. जो तपास केला तो सीबीआय (CBI) जाहीर का करत नाही असा प्रश्न केसरकरांनी उपस्थित केला आहे. ज्यांचा या प्रकरणाशी कोणताचं संबध नाही त्यांच्यावर आरोप करायचे बदनामी करायची असं सगळं सुरु असल्याचे त्यांनी नमूद केले.

संजय राऊत (sanjay raut) तुमच्याबद्दल बोलले होते का ?मग तुम्ही का बोलता, संसदेत तुम्हाला उत्तर देता येत नाही मग इथे येऊन का बोलता? किरीट सोमय्याच्या (kirit somaiya) पत्रकार परिषदेला पुष्टी देण्यासाठी तुम्ही पत्रकार परिषद घेता मग तुमच्यावर किरीट सोमय्यांनी त्यावेळेस केलेले आरोप खरे मानायचे का? तुम्ही त्यावेळेस सामोरे न जाता लोटांगण घालून भाजपात (bjp) गेलात अशी टीका केसरकरांनी राणेंवर केली.

सोमय्या कोणाबद्दल बोलले, राऊत कोणाबद्दल बोलले त्यात तुम्ही का उडी घेता असा प्रश्न दिपक केसरकर यांनी उपस्थित केला आहे. तुम्हाला बोलायचचं असेल तर संसदेत चांगला परफॉर्मन्स दाखवा असा टोला दीपक केसरकर यांनी राणेंना लगावला आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maggi Dosa Recipe : मुलांना टिफीनमध्ये द्या झटपट बनवलेला मॅगी डोसा; वाचा 5 मिनिटांत तयार होणारी रेसिपी

Maharashtra News Live Updates: पंतप्रधान मोदींचा आज वर्धा दौरा; असा असेल कार्यक्रम...

Palghar Crime: निर्मात्याकडून अश्लील मेसेज अन् छेडछाड; २६ वर्षीय अभिनेत्रीची पोलिसात तक्रार, मुंबईमधील धक्कादायक प्रकार

Bigg Boss Marathi : संग्रामला टोला, अरबाजचं तोंडभरून कौतुक; उत्कर्ष शिंदे काय म्हणाला ?

Western Railway Jobs : पश्चिम रेल्वेत सर्वात मोठी भरती, तब्बल ५०६६ जागा भरणार, पगार किती ? तुम्ही पात्र आहात का? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT