Bhaskar Jadhav  Saam TV
महाराष्ट्र

गद्दारांनी उद्धव साहेबांना राजगादीवरून खाली उतरवलं, भास्कर जाधवांचा शिंदे गटावर हल्लाबोल

शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी एकनाथ शिंदे गटावर दसरा मेळाव्यात तोफ डागली आहे.

नरेश शेंडे

मुंबई : उद्धव ठाकरेंच्या विचारांचं सोनं लुटण्यासाठी आपण सगळे आलो आहोत. बाळासाहेबांचे विचार ऐकले, माझं सौभाग्य आहे, मी उद्धव ठाकरे साहेबांचं विचार व्यासपीठावर बसून ऐकलं आहे, गेले काही महिने या महाराष्ट्रात हळहळ आहे. उद्धव ठाकरेंनी वर्षा बंगाल सोडला आणि अवघ्या महाराष्ट्रात मायलेकींचं अश्रू तरळलं. सभ्य सुसंस्कृत माणसाला त्यांच्याच माणसाने गादीवरून खाली खेचले. गद्दारांनी उद्धव साहेबांना राजगादीवरून खाली उतरवलं आणि सारा महाराष्ट्र हळहळला, अशा शब्दात शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटातील आमदारांवर केला आहे.

गेल्या ५६ वर्षात एकच दसरा मेळावा झाला, एकच मैदानात झाला, तो हाच दसरा मेळावा मला माहीते. बाळासाहेबांनी कॉंग्रेसवर टीका केली. तेव्हाही कॉंग्रेसची सत्ता असताना त्या नेत्यांनी बाळासाहेबांच्या विचारांचा आदर केला. पण आता हे गद्दार हिंदुत्वाची व्याख्या सांगतायेत. आम्हाला मैदान देण्याचं नाकारलं होतं. पण त्यांनी सुद्धा मैदान देण्याचं मान्य केलं. बाळासाहेबांनी सांगितलं होतं, माझी तब्येत खालावली आहे.

माझ्या उद्धवला सांभाळा आणि याच गद्दारांनी त्यांना खाली खेचलं. ही शिंदे शाही नाही तर ही मोघल शाही आहे, मी पत्रकारांना सांगितलं शिवतीर्थावरचा दसरा मेळावा खरा आहे. बीकेसीला कचरा मेळावा आहे. शिवाजी पार्कावर खुद्दारांचा मेळावा आहे. बीकेसीला गद्दारांचा मेळावा आहे. ज्या धनुष्यबाणावर तुम्ही निवडूण आलात ते गोठवण्याचा हे गद्दार प्रयत्न करतायत. यांचे खोके आम्ही खाली करणार, असा इशारा भास्कर जाधव यांनी दसरा मेळाव्यात दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ryanair Fire : विमानाला लागली अचानक आग; जीव वाचवण्यासाठी प्रवाशांच्या उड्या, व्हिडिओ आला समोर

Stomach Ache: पोटदुखी, गॅस, अ‍ॅसिडिटीने त्रस्त आहात? मग करा 'हे' सोपे उपाय

Maharashtra Live News Update: काटई - बदलापूर रोडवर कारला लागली आग

मोठी बातमी! विजयाच्या मेळाव्यानंतर राजकीय घडामोडींना वेग; ठाकरे गटाकडून भाजपच्या मोठ्या नेत्याला ऑफर?

IND vs ENG 2nd Test Score: शुबमनकडून इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई; दुसऱ्या डावातही ठोकलं शतक

SCROLL FOR NEXT