Bhaskar Jadhav, Eknath Shinde , Maharashtra, Uddhav Thackeray,  saam tv
महाराष्ट्र

Chiplun : 'निखाऱ्यावरून चालताना चटके हे बसणारच', मुख्यमंत्र्यांनी समन्यायी वागावं : भास्कर जाधव

ज्या ज्या पक्षाच्या नेत्यांवर गैरवक्तव्य हाेताहेत आणि जे करीत आहेत त्यांच्यावर देखील कारवाई करावी असे आमदार जाधव यांनी नमूद केले.

साम न्यूज नेटवर्क

- जितेश कोळी

Bhaskar Jadhav : प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर शिवसेना (shivsena) नेते आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी 'निखाऱ्यावरून चालताना चटके हे बसणारच' अशी मार्मिक प्रतिक्रिया माध्यमांना दिली. ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने झालेल्या मेळाव्यात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या विरोधात प्रक्षोभक भाषण केल्या प्रकरणी ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यात सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातमध्ये भास्कर जाधव यांचा समावेश आहे. (Breaking Marathi News)

याबाबत आज चिपळुण येथे माध्यमांनी शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव यांना छेडलं असता त्यांनी 'निखाऱ्यावरून चालताना चटके हे बसणारच' अशी भावना केली. ते म्हणाले याबाबत पाेलिसांनी तपासल्याशिवाय अशा प्रकारचा गुन्हा दाखल करता येत नाही. गुन्हा दाखल केला असेल तर आम्ही त्याला कायदाने उत्तर देऊ असेही जाधव यांनी नमूद केले. (Bhaskar Jadhav Latest Marathi News)

शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव म्हणाले गुन्हा दाखल केल्यानंतर आमच्यावर काही फरक पडेल असं त्यांना वाटत असेल तर गद्दारीच्या विराेधात उठलेले रान आता थांबणार नाही. हा विषय काेणाच्या एका हातात राहिलेला नाही. हा विचारांचा वणवा संपुर्णत: महाराष्ट्रात पेटलेला आहे. हा वणवा भविष्यात असाच वाढत जाईल असा सूचक इशारा देखील भास्कर जाधव यांनी विरोधकांना दिला.

दरम्यान त्यांच्या बाजूने असलेला लाेक उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याबाबतीत काय काय बाेलताहेत. मुख्यमंत्र्यांनी समन्यायी पद्धतीने वागलं पाहिजे असं आमदार जाधव यांनी नमूद केले. ते म्हणाले ज्या ज्या पक्षाच्या नेत्यांवर गैरवक्तव्य हाेताहेत आणि जे करीत आहेत त्यांच्यावर देखील कारवाई करावी आणि आपण किती निस्पृह आहाेत हे दाखवून द्यावे.

शिवसेना पक्षाला मिळालेले मशाल हे चिन्ह निवडणूक आयोगाने दिले असून जर एखाद्या पक्षाला या चिन्हाबाबत आक्षेप असेल तर त्यांनी भारतीय निवडणूक विभागाकडे याबाबत दावा करावा असेही आमदार भास्कर जाधव यांनी एका प्रश्नावर उत्तर देताना नमूद केले. शिवसेनेला मिळालेले मशाल या चिन्हावर समता पक्षाकडून दावा केला जात असल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार भास्कर जाधव यांनी समता पक्षाला हा सल्ला दिला आहे. (Tajya Batmya)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ISRO Recruitment: इस्त्रोमध्ये नोकरीची संधी; पगार १.७७ लाख रुपये; पात्रता काय? वाचा सविस्तर

IND vs AUS : विराटसोबत ऑस्ट्रेलियात पहिल्यांदाच असं झालं, कुणाला विश्वासही बसणार नाही

Calcium Deficiency: शरीरात कॅल्शियम कमी असल्यास कोणती गंभीर लक्षणे दिसतात? जाणून घ्या

Thackeray Shivsena News : ठाकरेंच्या शिवसेना नेत्याला जीवे मारण्याची धमकी, गुंडाच्या त्या कृत्यामुळे कल्याणमध्ये संताप, वाचा नेमकं काय घडलं?

Shrutz Haasan Photos: कपाळी टिकली अन् कातील नजर, साऊथच्या अभिनेत्रीने केले तरूणांना घायाळ

SCROLL FOR NEXT