Shivsena leader Ambadas Danave Saam Tv
महाराष्ट्र

...तर पोलिसांना सोडणार नाही, अंबादास दानवेंचा शिंदे-फडणवीस सरकारला इशारा

राज्य सरकार सत्तेचा दुरूपयोग करून उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसैनिकांवर सूडबुद्धीने हल्ला करत आहे.

लक्ष्मण सोळुंके

जालना : शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून शिवसेनेच्या गोटात खळबळ माजली आहे. राज्य सरकार सत्तेचा दुरूपयोग करून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav Thackeray) यांच्यासह शिवसैनिकांवर सूडबुद्धीने हल्ला करत आहे, असा आरोप शिवसेनेच्या नेत्यांकडून केला जात आहे. अशातच विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावर अंबादास दानवे (Ambadas Danve) यांची वर्णी लागल्यानंतर शिंदे गटावर सडकून टीका केली जात आहे. शिवसैनिकांवर खोटे गुन्हे दाखल केले, तर पोलिसांना (Police) सोडणार नाही, असा धमकीवजा इशाराच दानवे यांनी शिंदे-फडणवीस सरकारला दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. (Ambadas Danve slams Maharashtra government)

बुलडाण्यात शिवसेनेच्या एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी शिंदे गटातील काही कार्यकर्ते या कार्यक्रम सुरु असताना घोषणाबाजी करत होते. त्यावेळी अंबादास दानवे यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. शिवसैनिकांवर खोटे गुन्हे दाखल केले, तर पोलिसांना सोडणार नाही, असं खळबळजनक वक्तव्य दानवे यांनी केलं आहे. शिवसेनेनं विरोधकांना जशाच तसं उत्तर दिलं आहे.

विरोधक अंगावर आले तर त्यांचा यथोचित पाहुणचार करण्यात येईल, असा इशारा दानवे यांनी शिंगे गटाला दिला आहे. आदील शाहा,कुतुब शाहाला परत पाठवलं, तुम्हालाही पाठवू, असा इशारा दानवे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनाही दिला. दानवे यांच्या आक्रमक वक्तव्यांमुळं राजकीय वातावरण तापलं आहे.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

NCPA कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर; पगारात भरघोस वाढ, वर्षाला ५० हजारांचा बोनस

Vidhyanand Bapat: गणेशोत्सवाला विरोध नाहीच, हल्ल्यानंतर विद्यानंद बापट यांची पहिली प्रतिक्रिया, कोणकोणत्या मुद्द्यावर काय म्हणाले?

Maharashtra News Live Update: अमरावती शहरातील 17 वर्षीय अल्पवयीन तरुणीची हत्या

Dahi Handi 2026: दहीहंडी फोडण्याची परंपरा कधीपासून सुरू झाली? गोविंदा मानवी मनोरे का रचतात? इतिहास जाणून घ्या

GDS Bharti 2026: १० वी पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी; लगेच जाणून घ्या प्रोसेस

SCROLL FOR NEXT