Bharat Jodo Yatra saam tv
महाराष्ट्र

Bharat Jodo Yatra: आदित्य ठाकरेंनी दिली राहुल गांधींना साथ; 'भारत जोडो यात्रे'त लावली शिवसैनिकांसोबत हजेरी

काँग्रेसकडून भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून विरोधकांना जोडण्याचे काम सुरू आहे. या यात्रेत शुक्रवारी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते, आमदार आदित्य ठाकरे सहभागी झाले आहेत.

साम टिव्ही ब्युरो

निवृत्ती बाबर

Aaditya Thackeray news : काँग्रेसच्या भारत जोडो यात्रा तमिळनाडू, केरळ, कर्नाटक आणि दक्षिणेतील राज्यातून महाराष्ट्रात पोहोचली आहे. काँग्रेसकडून भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून विरोधकांना जोडण्याचे काम सुरू आहे. या यात्रेत शुक्रवारी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते, आमदार आदित्य ठाकरे सहभागी झाले आहेत. राहुल गांधी आणि आदित्य ठाकरे एकत्र आल्याने चर्चेला उधाण आलं आहे. (Latest Marathi News)

काँग्रेसच्या 'भारत जोडो यात्रे'चा ६५ वा दिवस आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील भारत जोडो यात्रेने महाराष्ट्रात सर्वात प्रथम नांदेड जिल्ह्यात पाऊल टाकले. काँग्रेस पक्षातील अनेक दिग्गज नेते यात्रेत सहभागी झाले आहेत. विरोधकांना जोडण्याचा प्रयत्न देखील 'भारत जोडो यात्रे'त केला जात आहे. याच यात्रेत आज, शुक्रवारी आमदार आदित्य ठाकरे राहुल गांधी यांच्या सोबत भारत जोडो यात्रेत सहभागी झाले. या वेळी त्याच्या सोबत शिवसेना नेते विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर तसेच इतर अनेक सहकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार श्री. आदित्य ठाकरे जी आज राहुल गांधी जी यांच्या सोबत भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी झाले आहेत. या वेळी त्यांच्या सोबत शिवसेना नेते, विधान परिषद विरोधी पक्षनेते श्री. अंबादास दानवे,विधान परिषदेचे आमदार श्री. सचिन अहिर तसेच इतर अनेक सहकारी आणि शिवसैनिक उपस्थित आहेत.

राहुल गांधी हे १८ नोव्हेंबर रोजी बुलढाणा जिल्ह्यातील शेगावमध्ये दुसरी सभा होणार आहे. काँग्रेसची भारत जोडो यात्रा राज्यात १४ दिवस चालणार आहे. भारत जोडो यात्रा १५ विधानसभा मतदार संघ आणि सहा लोकसभा मतदारसंघातून जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कहां गायब हो गये ये लोग? जगदीप धनखड यांच्यानंतर आणखी एकजण बेपत्ता, ठाकरेंच्या खासदाराचा खळबळजनक आरोप

Home Beauty Remedies: चेहऱ्यावर बटर लावल्याने तुम्हाला हे फायदे मिळतील, त्वचा राहिल चमकदार

Border 2: सनी देओलला मोठा झटका! 'बॉर्डर 2'ची रिलीजची तारीख अचानक बदलली, अभिनेता म्हणाला...

Disha Patani: दिशा पटानीचा 'सुपरबोल्ड' लूक; फोटोंनी उडवली झोप

Maharashtra Live News Update: जम्मू- कश्मीरमध्ये पुन्हा ढगफुटी, आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT