Ketaki Chitale On Jitendra Awhad: हर हर महादेव चित्रपटावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. चित्रपटादरम्यान प्रेक्षकाला मारहाण केल्या प्रकरणी आमदार जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आली आहे. अशातच हर हर महादेवच्या या वादात अभिनेत्री केतकी चितळेने उडी घेतली आहे. केतकीने जितेंद्र आव्हाडांवर विनयभंगाचा आरोप केला आहे.
मनसे आणि राष्ट्रवादी यांच्यामध्ये सुरू असलेल्या हर हर महादेव चित्रपटाचा वाद अजूनच रंगला आहे. व्हीव्हीयाना मॉलमध्ये चित्रपटादरम्यान एक प्रेक्षकाला मारहाण करण्याच्या आरोपावरून आमदार जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आली आहे. तर अभिनेत्री केतकी चितळे हिने या वादात हस्तक्षक्षेप करत जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणीत आणखी वाढ केली आहे.
केतकी चितळे हिच्या वकिलांनी पोलिसांना पत्र लिहिले आहे. पोलिसांनी लिहिल्या या पात्रात केतकीच्या वकिलांनी आमदार जितेंद्र आव्हाड आणि इतरांवर विनयभंग आणि कट रचण्याची गंभीर कलमे लावण्याची मागणी केली आहे. जितेंद्र आव्हाड यांचे कृत्य घृणास्पद आहे. 'गंभीर कलमे लावून कारवाई करावी' अशी मागणी केतकी चितळेच्या वकिलांनी केली आहे. (Ketaki Chitale)
हर हर चित्रपटाच्या शो दरम्यान ज्या प्रेक्षकाला मारहाण करण्यात आली त्यावेळी त्याच्यासोबत त्याची पत्नी आणि मुलगी सुद्धा होती. प्रेक्षकाच्या पत्नी सोबत आव्हाडांच्या कार्यकर्त्यांनी गैरवर्तन केल्याचा आरोप केतकी चितळेंच्या वकिलांनी पत्रामध्ये केला आहे. तसेच गैरवर्तन करणाऱ्यांना अटक करावी अशी मागणी सुध्या तिच्या वकिलांनी केली आहे. (Movie)
गैरवर्तन प्रकरणात जितेंद्र आव्हाड यांच्यावर महत्वाचे गुन्हे दाखल होऊ शकतात. त्यामुळे आव्हाडांच्या अडचणीत आणखी वाढ होणार हे निश्चित आहे. (Jitendra Awhad)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.