cm eknath shinde, rahul shewale and bhavana gawali saam tv
महाराष्ट्र

एकनाथ शिंदे गटातील खासदारांच्या अडचणी वाढणार? शिवसेनेची न्यायालयात धाव

एकनाथ शिंदे गटाने उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का दिला, पण....

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : एकीकडे एकनाथ शिंदे गटातील (eknath shinde) १६ बंडखोर आमदारांच्या अपात्रतेबाबत शिवसेना विरुद्ध शिंदे गट असा सामना सुप्रीम कोर्टात रंगला आहे. असे असतानाच आता शिवसेना शिंदे गटात सामील झालेल्या १२ खासदारांविरोधातही आव्हान याचिका न्यायालयात दाखल करणार आहे, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. लोकसभेचे गटनेते राहुल शेवाळे (Rahul Shewale) आणि मुख्य प्रतोद भावना गवळी (Bhavana Gawali) यांना लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला (om birla) यांनी मान्यता दिली. पण त्यांच्याविरोधात शिवसेना न्यायालयात दाद मागण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे जवळपास ४० आमदार बंडाचे निशाण फडकावून गुवाहाटीत गेले. त्यानंतर गल्लीपासून दिल्लीपर्यंत एकनाथ शिंदे यांची चर्चा झाली. महाराष्ट्रात राजकारण ढवळून काढणाऱ्या एकनाथ शिंदे गटाने भाजपच्या सहाकर्याने सत्तांतर केलं. परंतु, शिंदे गट एवढ्यावरच थांबला नाही, त्यांनी शिवसेनेचे नगसेवक, माजी आमदार आणि पदाधिकाऱ्यांना आपल्या गटात सामील केले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला. बंडाळीची जखम ताजी असतानाच आता शिंदे गटाने १२ खासदारांचा पाठिंबा मिळवून शिवसेनेच्या जखमेवर पुन्हा मीठ चोळले आहे.

राहुल शेवाळे पत्रकार परिषदेत म्हणाले होते, 'आम्ही सर्व खासदारांनी शिवसेना-भाजप युतीच्या माध्यमातून निवडणूक लढवली. त्यानंतर प्रचंड मताधिक्याने विजयी झालो. २०१९ साली उद्धव ठाकरेंनी वचननामा बनवला होता. त्यात देशाचे संरक्षण, राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य दिलं होतं. सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी शिवसेना-भाजप एकत्र राहतील. राम मंदिराच्या मुद्द्यावरून भाजपला पाठिंबा, एनडीएला संधीसाठी युती महत्वाची, सक्षम विचार करून निर्णय घेणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना संधी मिळावी, यासाठी युती महत्वाची होती, या बाबी नमूद होत्या'.

मात्र, दुर्दैवाने महाविकास आघाडी झाली. या आघाडीच्या कॉमन अजेंडामध्ये शिवसेनेच्या वचननाम्याचा उल्लेख नव्हता. तर या कॉमन अजेंडामध्ये संभाजीनगरचा नामांतराचाही उल्लेख नव्हता. स्वत: शरद पवारांनी संभाजीनगरचा विषय कॉमन अजेंडामध्ये नसल्याचे सांगितले. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांचा विचार पुढे नेण्याचा संकल्प केला आहे. त्यांच्या संकल्पाला पाठिंबा देण्यासाठी आलो आहोत. त्यांचं नेतृत्व आम्ही स्वीकारलं आहे. त्यांचं धोरण आम्ही स्वीकारलं आहे. या नेतृत्वाच्या माध्यमातून आम्ही हा निर्णय घेतला आहे', असे राहुल शेवाळे काल झालेल्या पत्रकार परिषदेत म्हणाले होते.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नरेंद्र मोदी यांच्या सरकारमुळे आज आपण श्वास घेतोय - प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

Mahapalika Election : ठाकरे बंधू युतीची घोषणा करण्याआधीच बालेकिल्ल्यात महायुतीची घोषणा, २ दिवसात जागावाटप

Mahayuti Politics : महायुतीत जागांसाठी रस्सीखेच; जागावाटपात शिंदेसेनेचा वेगळाच फंडा, VIDEO

Mumbai Traffic: मुंबईत तयार होतोय केबल- स्टे ब्रिज, मढ-वर्सोवा दीड तासांचा प्रवास होणार फक्त १० मिनिटांत

Municipal Corporations Election: महापालिकांवर कब्जा, त्याचा मंत्रालयावर झेंडा, 9 महापालिका ठरवणार राज्याचा 'किंगमेकर'

SCROLL FOR NEXT