मुंबई : एकनाथ शिंदे गट आणि शिवसेनेचा (shivsena) वाद सुप्रीम कोर्टात पोहोचल्याने नव्याने स्थापन झालेलं शिंदे-फडणवीस सरकार धोक्यात येणार का ? असा सवाल गेले काही दिवस राजकीय वर्तुळात घिरट्या घालत आहे. सुप्रीम कोर्टाच्या (supreme court) आजच्या निर्णयावर सर्वांचे लक्ष लागले होते. परंतु, आज सुप्रीम कोर्टाने परिस्थिती जैसे थे ठेवत पुढील सुनावणी १ ऑगस्टला होणार असल्याचे सांगितले आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिलीय. सुप्रिम कोर्टाने विरोधकांचं म्हणणं गांभिर्यानं घेतलं नाही. आम्ही बेकायदेशीरपणे काम केलं नाही. लोकशाहीत (Democracy) बहुमताला महत्व असतं. न्यायालय घटना, कायदा, नियम डोळ्यासमोर ठेवून निर्णय घेईल. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत न्यायालयाची कोणतीही अडचण नाही. न्यायालयाने मंत्रिमंडळ विस्तारावर बंदी घातली नाही, असं शिंदे पत्रकार परिषदेत माध्यमांशी बोलताना म्हणाले.
यावेळी एकनाथ शिंदे यांनी ओबीसींच्या आरक्षणावरही भाष्य केलं. ते म्हणाले, मी नगरविकास मंत्री असताना बांठिया आयोगाच्या संपर्कात होतो. ओबीसी समाजाच्या आरक्षणाबाबत आज महत्वाचा निर्णय झाला आहे. ओबीसी समाजाचा हा विजय आहे. ओबीसी समाजाच्या न्याय हक्काच्या लढ्याला यश मिळालं आहे. बांठीया आयोगासोबत माझी सततची चर्चा होत होती.
मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शिवसेना-भाजपचे नवीन सरकार आल्यानंतरही बांठीया आयोगाशी चर्चा केली. ओबीसी समाजाचे मी अभिनंदन करतो.ओबीसी समाजाला जो शब्द दिला होता,तो आम्ही पाळला आहे. ओबीसी आरक्षणसाठी मी दिल्लीत तीन वेळा गेलो. नवीन सरकारचा पायगुण चांगला आहे, असं म्हणावं लागेल. ओबीसी आरक्षणाबाबत आम्हाला कुठलेही श्रेय घ्यायचे नाही, असंही शिंदे म्हणाले.
आमच्या आमदारांमध्ये आणि आमच्यात संभ्रमावस्था नाही. आमच्या वतीने हरिश सावळे तुषार मेहता आणि इतर टीमने प्रभावीपणे बाजू मांडली.लोकशाहीत घटना, कायदा, नियम पुराव्यांना महत्व असतं, आम्ही पक्ष सोडला नाही, कुठल्याही पक्षात गेलो नाही, महा डिटेलमध्ये जायंच नाही, कारण ही न्यायप्रविष्ट बाब आहे. सुप्रीम कोर्टाने त्यांचं म्हणणं गांभिर्यानं घेतलं नाही.आम्ही बेकायदेशीरपणे काम केलं नाही, लोकशाहीत बहुमताला महत्व असतं.
न्यायालय घटना कायदा नियम डोळ्यासमोर ठेवून निर्णय घेवू. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत न्यायालयाची कोणतीही अडचण नाही. विधिमंडळाचे अधिकार असतात, आमच्याकडे बहुमत आहे, त्यामुळे आम्हाला काळजी कऱण्याची गरज नाही, कालच १२ खासदारांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र दिलं त्यानंतर राहुल शेवाळे यांची लोकसभा गटनेते पदावर अधिकृतपणे नियुक्ती करण्यात आली, असंही शिंदे यांनी स्पष्ट केलं.
Edited By - Naresh Shende
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.