Mumbai Naka Police Station Saam Tv
महाराष्ट्र

Nashik Politics: '5 लाख द्या नाही तर पराभव करेन'; शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवाराकडे खंडणीची मागणी

नाशिकमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवाराकडे खंडणी मागितल्याची घटना घडली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नाशिकमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवाराकडे खंडणी मागितल्याची घटना घडली आहे. नाशिकमधील उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार आणि माजी आमदार वसंत गीते यांच्या कार्यालयात येऊन ईव्हीएम मशीन हॅक करून तुम्हाला विजयी करून देतो, त्यासाठी 42 लाख रुपये लागतील, पैसे न दिल्यास मशीन सेट करणारे माझ्या ओळखीचे असून त्यांना सांगून तुमचा पराभव निश्चित असल्याचे सांगत 5 लाख रुपयांची खंडणी मागितली.

नाशिकच्या मुंबई नाका पोलिसांनी 4 तासांत कारवाई करून आरोपीला ताब्यात घेतले. निवडणुकांमध्ये पैसे कमवण्याची संधी पाहून आपण हा प्रकार केल्याचे आरोपीने कबूल केले.

तसेच मिळालेल्या माहितीनुसार, भगवानसिंग चव्हाण असे आरोपीचे नाव असून तो मूळचा राजस्थानचा असून सध्या नाशिकच्या म्हसरूळ परिसरात रोजगाराच्या निमित्ताने राहतो. त्याने नाशिकमध्ये आमदार वसंत गीते यांच्या कार्यालयात जाऊन कार्यालयातील आनंद शिरसाठ यांना 'मी तुम्हाला ईव्हीएम मशीन हॅक करून 10 मतदानांपैकी 3 ते 4 मते तुम्हाला मिळवून देऊन निवडणुकीमध्ये जिंकून देतो. या बदल्यात 42 लाख रुपये लागतील, असे सांगितले. त्यापैकी 5 लाख आता द्यावे, अशी मागणी केली. या घटनेमुळे मात्र सर्वत्र खळबळ उडाली आहे.

पदाधिकाऱ्यांनी पैसे देण्यास नकार दिल्यानंतर पैसे न दिल्यास प्रोग्रामिंग करणारे माझे ओळखीचे आहेत. मशीन हॅक करून तुमचा उमेदवार पराभूत करेन, अशी धमकी त्या आरोपीने दिली. यानंतर तो पत्ता सांगून निघून गेला. शिरसाठ यांनी याप्रकरणी बुधवारी मुंबई नाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी भगवानसिंगला अटक केली. सध्या पोलीस त्याची चौकशी करत आहेत.

Written By: Dhanshri Shintre.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ट्रम्पचा फुगा अमेरिकेनंच फोडला; इराण बलशाली अमेरिकी अधिकाऱ्यांचीच कबुली

Shocking: धावती ट्रेन पकडताना हात सुटला, ५ सेकंद प्लॅटफॉर्म अन् ट्रेनच्या मधोमध फरफटत गेला तरुण; थरकाप उडवणारा VIDEO

Saturday Horoscope : आयुष्यात वादळ येणार, धाडसी निर्णय घ्यावा लागणार; ५ राशींच्या लोकांसाठी शनिवार आव्हानात्मक असणार

Maharashtra Live News Update : कल्याणमध्ये गांधारी रिंग रोड ठरतोय स्टंटबाजांचा अड्डा

Akola: उच्चभ्रू वस्तीत वेश्या व्यवसाय, पोलिसांनी धाड टाकली; २ महिला अन् एका पुरूषाला नको त्या अवस्थेत पकडलं

SCROLL FOR NEXT