Devendra Fadnavis-Eknath SHinde
Devendra Fadnavis-Eknath SHinde Saam TV
महाराष्ट्र

Chandrakant Khaire News: शिंदे-फडणवीसांचे समृद्धी महामार्गातील भ्रष्टाचार लपवण्यासाठी बंड, चंद्रकांत खैरेंचा गंभीर आरोप

लक्ष्मण सोळुंखे, साम टीव्ही जालना

Jalna News : राज्यात शिंदे-फडणवीस सरकार का आणि कसं? स्थापन झालं याची अनेक कारणं आजवर अनेकांना दिली. भाजप आणि शिंदे गटातील नेत्यांना वेळोवेळी विविध कारणं या बंडाची दिली आहेत. आज राज्याचे आरोग्यमंत्री आणि शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांनीही बंड आणि सरकार स्थापनेबाबत मोठा गौप्यस्फोट केला. (Political News)

तानाजी सावंत यांनी केलेल्या वक्तव्यावर बोलताना, ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले. शिंदे-फडणवीसांनी समृद्धी महामार्गाचा गैरफायदा घेतला आहे.

या महामार्गाला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देऊन या समृद्धी महामार्गाच्या कामात या जोडीने मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे. हा भ्रष्टाचार उघड होऊ नये म्हणून त्यांनी डाव आखला, असा गंभीर आरोप चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.

शंभर काय त्याहून अधिक बैठका घेऊन शिवसेना संपून टाकण्याचा डाव रचत शिंदे, फडणवीसांनी आपलं सरकार स्थापन केलं, हे आता त्यांचीच लोक सांगत आहे. त्यामुळे समृद्धी महामार्गाचा भ्रष्टाचार लपवण्यासाठी या जोडीचा हा डाव असल्याचाही आरोप खैरे यांनी केला.

पन्नास खोके एकदम ओके बोलणार

सुप्रीम कोर्टाने जरी आमच्यावर सोशल मीडियावर बंदी आणली असली तरी आम्ही पन्नास खोके एकदम ओके म्हणणार असल्याची प्रतिक्रिया चंद्रकांत खैरे दिली. आज सुप्रीम कोर्टाने ठाकरे गटाला सोशल मीडियावर पन्नास खोके एकदम ओके म्हणता येणार नसल्याचा आदेश दिला आहे. यानंतर खैरे यांनी सोशल मीडियावर नाही तर आम्ही प्रत्यक्षात मात्र म्हणणारच असल्याचं म्हटलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Live Breaking News: धाराशिवमध्ये ५५.४६ टक्के मतदान : कांही केंद्रांवर सांयकाळी सात नंतरही मतदान सुरू

Haryana Politics: हरियाणात भाजपला मोठा धक्का, 3 अपक्ष आमदारांनी सोडली साथ; सरकार अल्पमतात येणार?

Vastu Tips On Mobile: मोबाईलवर ठेवा हे वॉलपेपर, नशीब बदलेल

Harshaali Malhotra : बजरंगी भाईजानच्या 'मुन्नी'ला आता पाहिलं का?, ओळखणं ही झालंय कठीण

Ramdev Baba : रामदेव बाबा यांना सुप्रीम कोर्टाचा झटका; न्यायालयाने पुन्हा याचिका फेटाळली, IMA च्या अध्यक्षांनाही बजावली नोटीस

SCROLL FOR NEXT