बुलढाणा : नारायण राणे यांनी नवीन उद्योग राज्यात कसे आणता येईल याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. फक्त शिवसेनेवर कुत्र्यासारखे भुंकणे बंद करावे असे वक्तव्य बुलढाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी केले आहे. बुलढाण्यात गायकवाड यांनी आज शहरातील मुख्य पाणी प्रश्नावर पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी शहरातील नागरिकांना दररोज पाणीपुरवठा कसा करता येईल यावर सविस्तर माहिती दिली.
हे देखील पहा :
उद्यापासून बुलढाणा शहरात दररोज अर्धा तास पाच दिवस पाणी पुरवठा केला जाणार असून त्यानंतर कायम एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जाईल. ही बुलढाणा शहरवासीयांना दिवाळी भेट असल्याचे त्यांनी सांगितले.
गायकवाड यांनी पाठीमागील काळात नारायण राणे यांना घरात घुसून मारू असे वक्तव्य केले होते. नारायण राणे आज बुलढाण्यातील चिखली येथे उद्योजक प्रशिक्षण कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. या संदर्भात गायकवाड यांना, नारायण राणे चिखली येथे आले आहेत आता तुमची भूमिका काय असं विचारलं असता, "राणे यांनी नसते उद्योग करू नये त्यांनी राज्यात नवीन उद्योग आणून बेरोजगारी कशी कमी करता येईल याकडे सकारात्मक दृष्टीने लक्ष्य देऊन काम करायला पाहिजे" असा टोला लगावला.
तसेच नारायण राणे यांनी शिवसेनेवर कुत्र्यासारखे भुंकणे हा उद्योग बंद करावा अशी जहरी शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी यावेळी बोलताना केली.
Edited By : Krushnarav Sathe
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.