Shivjanmotsav 2025 Saam Tv
महाराष्ट्र

Shivjanmotsav 2025 : शिवनेरीवर रंगणार 'शिवजन्मोत्सव', मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार 'हिंदवी स्वराज्य महोत्सव'चे उद्घाटन

Shivjanmotsav News : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९५ व्या जयंतीच्या निमित्ताने हिंदवी स्वराज्य महोत्सव २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाला १७ फेब्रुवारी रोजी सुरुवात होणार आहे.

Yash Shirke

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti : छत्रपती शिवरायांच्या ३९५ व्या जयंती निमित्त महाराष्ट्र राज्य पर्यटन विभाग, पर्यटन संचालनालय व पुणे जिल्हा प्रशासनाच्या वतीने पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथील शिवनेरी किल्ल्यावर, शंकरराव बुट्टे-पाटील विद्यालय मैदानाच्या प्रांगणात दि. १७ ते १९ दरम्यान 'हिंदवी स्वराज्य महोत्सव २०२५' चे आयोजन करण्यात आले आहे.१७ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी १० वाजता या सोहळ्याचे उद्धाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त दि. १९ फेब्रुवारी २०२५ रोजी त्यांच्या जयंतीनिमित्त १७ ते १९ फेब्रुवारी २०२५ पर्यंत महाराष्ट्राची संस्कृती, कला, लोककला, सभ्यता आणि परंपरा दाखवणाऱ्या विविध कार्यक्रमांचा समावेश असलेल्या 'शिवजन्मोत्सवाचे' आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्हा पालकमंत्री अजित पवार, सहकार आणि नागरी विमान वाहतूक केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ ,उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील, क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे, विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, इंद्रनील नाईक, राज्यसभा सदस्य मेधा कुलकर्णी, सुनेत्रा पवार, लोकसभा सदस्य सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे, डॉ. अमोल कोल्हे, पुणे जिल्ह्यातील सर्व विधानपरिषद विधानसमा सदस्य आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

महोत्सवातंर्गत दि.१७ फेब्रुवारी सकाळी १० ते रात्री ९ पर्यंत राज्यातील महिला बचतगटांच्या उत्पादनांना चालना देण्यासाठी विविध बचतगटांची उत्पादने व खाद्य पदार्थाच्या स्टॉलचे प्रदर्शन लावण्यात येणार आहे. सकाळी ९ ते सायंकाळी ६ पर्यंत महाराष्ट्राच्या जिद्दीचे प्रतीक असलेली शिवनेर महोत्सव बैलगाडा शर्यत घेण्यात येणार असून मराठी मातीतील भव्य कबड्डी स्पर्धा सकाळी ११ वाजता असणार आहे. रात्रौ. ८ वाजता शिवस्पर्श शिवसह्याद्री सरसेनापती उमाबाई दाभाडे प्रतिष्ठानच्या वतीने (शिवसह्याद्री ऐतिहासिक महानाटयाचा) प्रयोग सादर करण्यात येणार आहे.

दि. १८ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी १० ते रात्री ९ पर्यंत विविध बचतगटांची उत्पादने व खाद्य पदार्थाच्या स्टॉलचे प्रदर्शन असणार आहे तर स्वरांजली कलामंच, पुणे निर्मित (गौरव माझ्या महाराष्ट्राचा) हा सांस्कृतिक कार्यक्रम रात्री ८ वाजता सादर करण्यात येणार आहे. तसेच शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर रात्री १२ वाजता छत्रपती शिवरायांना मानवंदना देण्यात येणार आहे.

दि. १९ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी १० ते दुपारी ४ पर्यंत जुन्नर तालुक्यातील गुणवंत कलाकार शिवकालीन खेळांची प्रात्यक्षिके सादर करतील. सायंकाळी ५ वाजता छत्रपती शिवरायांची महाआरती व सायंकाळी ६ वाजता भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. सायंकाळी ७ वाजता सुप्रसिद्ध पार्श्वगायिका वैशाली सामंत यांचा संगीत रजनी कार्यक्रम होणार आहे.

दि. १७ ते १९ फेब्रुवारी २०२५ दरम्यान हा शिवजन्मोत्सव जुन्नर येथील शंकरराव बुट्टे-पाटील विद्यालय मैदानाच्या प्रांगणात पार पडणार असून महाराष्ट्रातील तमाम नागरिक आणि शिवप्रेमींनी या महोत्सवाला आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य पर्यटन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, पर्यटन संचालक डॉ.बी.एन. पाटील यांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT