shivendraraje bhosale & udayanraje bhosale
shivendraraje bhosale & udayanraje bhosale 
महाराष्ट्र

नारळ फाेड्या गॅंगला जनता घरी बसवेल; राजेंचा उदयनराजेंवर राेख

साम न्यूज नेटवर्क

सातारा : जसं सातारा (satara) पालिकेची निवडणुक जवळ येईल तसं यांचा नारळ फाेडण्याचा उपक्रम सुरुच राहील. त्यामुळे जनतेने नारळ फाेड्या गॅंगपासून सावध रहावे. जे आपण केलेच नाही ते केले सांगत हे तुम्हांला भुलवतील अशी खरमरीत टीका आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले (shivendraraje bhosale) यांनी खासदार उदयनराजे भाेसले (udayanraje bhosale) यांच्यावर केली आहे. satara political news

शाहूपूरीवासियांना २० वर्षापासून तुम्ही वंचित ठेवले असा आराेप खासदार उदयनराजे भाेसले यांनी तुमच्यावर केला आहे या प्रश्नावर शिवेंद्रसिंहराजे म्हणाले जे काम मंजूर हाेते त्याचा नारळ फाेडायला ही मंडळी पुढं असतात. गत २० वर्षात त्यांच्याकडे खासदारकी हाेती. काही काळ ते मंत्री देखील हाेते. शाहूपूरीची ग्रामपंचायत, पंचायत समिती सदस्य तसेच जिल्हा परिषद सदस्य यांच्याच नेतृत्वाखाली निवडून येत हाेते. खरंतर २० वर्षापासून शाहूपूरीवासियांना त्यांना जबाबदारी दिली हाेती. त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यापासून काेणी वंचित ठेवले? असा प्रश्न राजेंनी विचारला आहे.

जसं निवडणुका जवळ येतील तसं त्यांचे नारळ फाेडण्याचा उपक्रम सुरु राहणार आहे. हद्दवाढीचा निर्णय यांच्यामुळेच लांबला हे सत्य आहे. ज्या मार्गाने पैसे मिळतील त्या मार्गाने खायचा असे त्यांचे काम सुरु असते. त्यामुळे नारळ फाेड्या गॅंगला सातारकर आता नारळ देतील आणि संपुर्ण सातारा विकास आघाडीला घरी बसवतील असा विश्वास शिवेंद्रसिंहराजेंनी व्यक्त केला.

edited by : siddharth latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live: शरद पवार यांच्या प्रकृतीविषयी मोठी अपडेट

Dindori Lok Sabha: आधी थोपटले दंड आता मिळवले हात; दिंडोरी लोकसभेतून जे पी गावितांची माघार

Govinda And Krushna Abhishek : कृष्णा- गोविंदा वादाचं नेमकं कारण काय?; गोविंदा जरा स्पष्टच बोलला

Raireshwar Fort: १६० मतदारांसाठी अधिकारी, कर्मचा-यांचा ४ हजार ५०५ फुटापर्यंत ट्रेक, रायरेश्वर केंद्र मतदानासाठी सज्ज

Black Pepper Benefits: काळी मिरी खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे, घ्या जाणून

SCROLL FOR NEXT