satara, shivendraraje bhosale, udayanraje bhosale saam tv
महाराष्ट्र

Shivendraraje Bhosale News : उदयनराजेंचा विषय मला माहित नाही, असं का म्हणाले शिवेंद्रसिंहराजे

आज आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले यांनी गाेडाेली तळ्याची पाहणी केली.

ओंकार कदम

Shivendraraje Bhosale News : खासदार उदयनराजे भाेसले यांचा विषय मला काही माहिती नाही. त्यांनी काय माहिती घेतली याची मला माहिती नाही. आमच्या नगरविकास आघाडीचे नगरसेवक शेखर माेरे- पाटील हे सातत्याने गाेडाेली तळ्याच्या विकासासाठी प्रयत्नशिल हाेते. आम्ही देखील त्यासाठी पाठपूरावा केला. राज्य शासनाने नुकतीच अमृत याेजनेतून गाेडाेली तळे सुशाेभिकरणास मान्यता दिली आहे असे आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले यांनी नमूद केले. (Satara Latest Marathi News)

साताऱ्यातील (satara) गोडोली तळ्याच्या विकासासाठी राज्य शासनाने निधी उपलब्ध करून दिला आहे. आज (बुधवार) आमदार शिवेंद्रराजे (shivendraraje bhosale) यांनी पालिकेचे अधिकारी आणि गोडोली मधील रहिवासी यांच्या समवेत तळ्याची पाहणी केली. त्यानंतर माध्यमांशी बाेलताना आमदार भाेसले यांनी गाेडाेली तऴ्या संदर्भात आम्ही व आमच्या नगरसेवकांनी केलेल्या पाठपूराव्यास यश आल्याचे सांगितले. (Maharashtra News)

दरम्यान मंत्री अब्दुल सत्तार (abdul sattar) यांच्या वक्तव्याबाबत बोलत असताना आमदार भाेसले म्हणाले महिलांबाबत कोणीही आदराने आणि सन्मानानेच बोलले पाहिजे. ही आपल्या संस्कृतीची शिकवण आहे आणि ती आपण जपली पाहिजे. (abdul sattar controversy)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पाटोदा येथे मुंबई दौऱ्यातील पहिल्या मुक्कामाची जय्यत तयारी सुरू आहे

Patole Recipe : केळीच्या पानांत वाफवलेल्या गोड पातोळ्या; जाणून घ्या साधी सरळ रेसिपी

80s Style Shirt Designs: ८०s शर्ट डिझाइन्स पुन्हा ट्रेंडमध्ये! 'या' ७ रेट्रो स्टाइल्सने मिळवा हटके आणि स्टायलिश लूक

India Fort : तीन रहस्यमयी दरवाजे असलेला ऐतिहासिक किल्ला, प्रत्येक द्वारामागे दडलीय वेगळी गोष्ट

Amit Shah: समान नागरी कायद्यावर केंद्राचा मोठा निर्णय; मुंबईत अमित शहांनी केली घोषणा

SCROLL FOR NEXT