satara saam tv
महाराष्ट्र

Shivendraraje Bhosale : मराठ्यांचा आवाज कधीही दडपला जाणार नाही, हा महाराष्ट्र मराठ्यांचा आहे : शिवेंद्रसिंहराजे भाेसले

Maratha Andolan : आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले यांनी साता-यात मराठा आंदाेलकांची भेट घेतली.

Siddharth Latkar

Satara News : मी आणि माझे कुटुंब आपल्या समवेत आहे. आमदार म्हणा किंवा राजकीय भूमिका मांडण्यास मी तुमच्याकडे आलाे नाही. राजधानी सातारा येथील सकल मराठा समाजाच्या भावना समजून घेत त्या सरकारपर्यंत पाेहचविण्यासाठी मी आलाे आहे असे आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले यांनी नमूद केले. दरम्यान महाराष्ट्रात मराठ्यांचा आवाज कधीही दडपला जाणार नाही. हा महाराष्ट्र मराठ्यांचा आहे. सरकारला त्यांना न्याय द्यावा लागेल असेही राजेंनी नमूद केले. (Maharashtra News)

मनोज जरांगे पाटील (manoj jarange patil) यांच्या समर्थनार्थ सकल मराठा समाज सातारा शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय येथे साखळी उपाेषणास बसला आहे. या उपाेषणस्थळी आज (मंगळवार) आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले यांनी भेट दिली. तसेच आमदार भाेसले यांनी त्यांची भूमिका आंदाेलकांपूढे विषद केली. गरजू मराठ्यांना आरक्षणाचा फायदा मिळावा ही सर्वांची भूमिका आहे तीच आमची देखील असल्याचे राजेंनी म्हटले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मराठ्यांना न्याय द्यावाच लागेल

आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले समाजापेक्षा मी माेठा नाही. समाजाची ताकतीमुळेच आम्ही आहाेत ही वस्तुस्थिती आहे. हे आंदाेलन आता समन्वयकांच्या हाती राहिले नाही हे खरे आहे. आता समाजानेच हे आंदाेलन हाती घेतले आहे. मराठ्यांचा आवाज कधीही दडपला जाणार नाही, हा महाराष्ट्र मराठ्यांचा आहे. मराठ्यांच्या न्याय हक्काची ही लढाई आहे. महाराष्ट्रातील सरकार असाे अथवा दिल्लीतील सरकार असाे मराठ्यांना न्याय हा द्यावाच लागेल असेही राजेंनी म्हटले.

शिवछत्रपती घराण्यावर प्रेम

आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले म्हणाले आमच्या घराण्यावर आपल्या सर्वांचे प्रेम आहे. मी असाे अथवा उदयनराजे (udayanraje bhosale) असाे शिवछत्रपतींच्या घराण्यावर तुम्ही सर्वजण प्रेम करणारे आहात. त्यामुळे आमदारकी असाे अथवा खासदारकी यापेक्षा तुमचे प्रेम म्हत्वाचे आहे.

पदे येतात जातात. या कायमच्या गाेष्टी नाहीत. परंतु छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घराण्यावरील तुमचे प्रेम, श्रद्धा कायम राहावी यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशिल राहू अशी भावना आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले (mla shivendra raje bhosale) यांनी व्यक्त केली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bacchu Kadu: आमदार, खासदार, पालकमंत्री, कलेक्टर मस्त ऐश करत आहेत; सुट्ट्या काढून पळाले सगळे – बच्चू कडू संतापले|VIDEO

Maharashtra Live News Update : धनत्रयोदशीनिमित्त करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीची श्री धन्वंतरी रूपात अलंकारिक पूजा

Genius Floating Shoes: पाण्यावर चालणार माणूस? पाण्यावर चालता येणारे शूज?

Raj and Uddhav Thackeray: ठाण्यात शिंदेंविरोधात ठाकरे बंधू एकत्र, संजय राऊतांनी केली मोठी घोषणा

Maharashtra Politics : नाशिकमध्ये वातावरण फिरलं; भाजपला मोठा धक्का, बडा नेता ठाकरे गटात जाणार

SCROLL FOR NEXT