shivendraraje bhosale 
महाराष्ट्र

Lockdown तातडीने मागे घ्या; शिवेंद्रसिंहराजे आक्रमक

ओंकार कदम

सातारा : सातारा जिल्हा प्रशासनाने सातारा जिल्ह्यातील कडक लॉकडाउन (lockdown) मागे घ्यावा अशी मागणी आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी जिल्हा प्रशासनास मागणी केली आहे. तुम्हांला निवडणुका चालतात आणि बाजारपेठच का बंद ठेवायचा ? असा प्रश्नही राजेंनी प्रशासनास केला आहे. (shivendraraje-bhosale-demands-collector-shekhar-sinh-to-unlock-satara-lockdown-breaking-news)

दोन दिवसांपूर्वी प्रशासनाने सातारा जिल्ह्यात कडक लॉकडाउनची घोषणा केली आहे. त्यानूसार साेमवार ते शुक्रवार या काळात केवळ अत्यावश्यक सेवा सुरु राहणार आहेत. अन्य दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिलेत. या निर्णयास व्यापारी आणि सामान्य नागरिकांचा तीव्र विरोध हाेऊ लागला आहे. आज (रविवार) सातारा जावळीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले यांनीही सातारा जिल्ह्यातील लाॅकडाउन तातडीने मागे घ्यावा अशी मागणी केली आहे. य़ाबाबत त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, एकच आठवडा व्यावसायिकांना दुकाने उघडण्याची संधी मिळाली. आत्ताच्या कडक लाॅकडाउनला नागरिकांचा तीव्र विराेध हाेत आहे. जिल्हा प्रशासनाने लाॅकडाउन मागे घ्यावा. निर्बंध कायम ठेवा. हवं तर विकेंड लाॅकडाउन (मेडिकल) सुविधा साेडली तर कडक करा. परंतु लाॅकडाउन हा मागे घ्या. याबराेबरच रुग्ण संख्या का वाढत आहे या मागे नेमके काय कारण आहे असा प्रश्न उपस्थित हाेत आहे. पुण्यासारख्या महानगरात रुग्ण संख्या कमी हाेत आहे. मग इथंच का वाढतीय असा प्रश्न निर्माण झाला आहे. अन्य काही गाेष्टीत प्रशासन कमी पडतय का याचा विचार त्यांनी करावा.

ज्या ठिकाणी तपासणी केली जाते त्या लॅब वेळेत रुग्ण संख्या अपलाेड करीत आहे का याची शहनिशा जिल्हाधिकारी कार्यालयाने करावी अशी मागणी शिवेंद्रसिंहराजेंनी केली आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे ज्या वेळी आकडा वाढताे ताे एकदम माेठ्या संख्येने वाढलेला दिसताे. त्यामुळे लॅब रुग्ण संख्या अपलाेड करण्यात दिरंगाई करीत असल्याची चर्चा आहे.

तुम्ही केलेली मागणी मान्य झाली नाही तर आंदाेलन छेडणार का या प्रश्नावर शिवेंद्रसिंहराजे म्हणाले सातारकरांनी जिल्हा प्रशासनास पहिल्यापासून सहकार्य केले आहे. व्यापारी वर्गाने तर खूप माेठे सहकार्य केले आहे. आमची मागणी मान्य झाली नाही तर आंदाेलन वगैरे करणार नाही. जिल्हा प्रशासनास आम्हाला अडचणीत आणायचे नाही. काेविड 19 च्या संकट काळात सहकार्याची भुमिका राहील असेही राजेंनी स्पष्ट केले. प्रशासनास निवडणुका चालताहेत. हे काही याेग्य नाही. याबराेबरच जे लाेक रुग्णांच्या संपर्कात आले त्यांची तपासणी केली जात नाही हे ही तिकेच खरं आहे. त्यांची शहनिशा झाली पाहिजे. प्रशासनातील यंत्रणेने रुग्णांच्या संपर्कातील लाेकांचा ग्राऊंड रिपाेर्ट घ्यावा असेही राजेंनी नमूद केले.

शिवेंद्रसिंहराजेंनी सामान्य माणूस, शेतकरी, व्यापारी यांना विचारत घेऊन प्रशासनाने लॉकडाउनचा निर्णय घ्यावा. लोकांना विचारात न घेता हा निर्णय घेतल्याने लोकांत तीव्र नाराजी असल्याचे स्पष्ट केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Women Qualities: महिलांच्या या सवयीचं पुरूषांकडून होतं कौतुक, जिंकतात हृदय

Parenting Tips: मुलांना शिस्त लावायची आहे? मग पालकांनी ही चूक कधीच करु नका अन्यथा...

Maharashtra Election : मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात दोन्ही सेनेचे शिवसैनिक आमनेसामने; पुढे नेमकं काय घडलं? वाचा

VIDEO : केलंय काम भारी, लुटली तिजोरी; उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला

AUS vs PAK: बाबर आझमने टी-२० क्रिकेटमध्ये रचला इतिहास! मोठ्या रेकॉर्डमध्ये विराटला सोडलं मागे

SCROLL FOR NEXT