mla shivendraraje bhosale satara
mla shivendraraje bhosale satara saam tv
महाराष्ट्र

Satara: 'ताे' निर्णय मागे घ्या, अन्यथा कंपनीचे काम बंद पाडणार; शिवेंद्रराजेंचा सुझलाॅनला इशारा

ओंकार कदम

सातारा : जिल्ह्यातील ठोसेघर (thoseghar), चाळकेवाडी (chalkewadi) , पाटण (patan) या भागामध्ये सुझलॉन कंपनीच्या पवनचक्क्यांचे (wind mill) जाळे मोठे विस्तारले गेले असून या माध्यमातून या भागातील स्थानिकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. मात्र सुझलॉन कंपनीच्या अधिकाऱ्यांनी एक नवीन अध्यादेश लागू केला आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील जे सुझलॉन कंपनीत काम करणारे कर्मचारी आहे त्यांना इतर राज्यात काम करण्याचे आदेश काढले आहेत. (Satara Latest Marathi News)

या घेतलेल्या निर्णयाबाबत स्थानिक कर्मचाऱ्यांनी आमदार शिवेंद्रराजे यांच्याकडे धाव घेत आपली व्यथा त्यांच्या समोर मांडली. आमदार शिवेंद्रराजे (shivendraraje bhosale) यांनी सुझलॉन कंपनीच्या अधिकाऱ्यांना थेट फोन करून अधिकाऱ्यांनी हे काढलेले आदेश तात्काळ मागे घ्यावेत असे सुनावले.

अन्यथा सुझलॉन (suzlon) कंपनीचे सातारा (satara) जिल्ह्यात ज्या ठिकाणी काम सुरू आहे त्या ठिकाणचे सर्व काम मी स्वतः जाऊन बंद पाडणार असल्याचा इशारा यावेळी आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी दिला आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live: पुण्यातील लार्गो पिझ्झा हॉटेल आग

Astro Tips: संध्याकाळी या वेळी लावा दिवा, लक्ष्मी येईल घरात

Mumbai News : ठाकरे गटाला भाजप उमेदवाराच्या कार्यलयाबाहेरील राडा भोवला, मुलुंडमधील 5 शिवसैनिकांना अटक

Krishi Seva Kendra: तीन कृषी सेवा केंद्राचे परवाने रद्द, नगरमध्ये खळबळ

Hingoli News: वय उलटूनही लग्न जमेना, नैराश्यातून तरुणाने संपवलं जीवन; हिंगोलीतील धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT