Udayanraje/ ShivsendraRaje SaamTV
महाराष्ट्र

"देवाकडून बंद होणारा ऑक्सिजन पुरवठा मीच सुरू केला असंही उदयनराजे म्हणतील"; शिवेंद्रराजेंचा टोला

'आपण त्यांच्यासारख्या अँक्टींग स्कुलमधून आलेलो नाही'

ओंकार कदम

सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या (Satara District Central Bank Election) निवडणूक रणधुमाळीला सुरवात झाली असून या निवडणुकीत खा.उदयनराजे भोसले (Udayan Raje Bhosle) यांना राष्ट्रवादीच्या पॅनल मध्ये अद्याप तरी जागा देण्यात आलेली नाही. त्यामुळे त्यांनी दबाव तंत्राचा वापर करत बँकेचे चेअरमन आ.शिवेंद्रराजे भोसले (Shivendra Raje Bhosale) आणि राष्ट्रवादीचे संचालक मंडळ यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू केल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. अशातच "सातारा येथे काय होत आहे हे सर्व उदयनराजेमुळे होत, साताराला ऑक्‍सिजनचा पुरवठा देवा कडून बंद होणार होता तो सुद्धा मी सुरू केलाला आहे असं सुध्दा ते म्हणतील" असा टोला शिवेंद्रराजेंनी उदयन महाराजांना टोला लगावला आहे. ते आज साताऱ्यात पत्रकारांशी बोलत होते. (Shivendra Raje's criticism of Udayan Raje)

हे देखील पहा -

जिल्हा मध्यवर्ती बँकेने जरंडेश्वर कारखान्याला (Jarandeshwar Factory) कर्ज दिले कसे ? असा सवाल उपस्थित करत मी बँकेत जागा अडविण्यासाठी संचालक झालो नाही तर शेतकऱ्यांच्या हिताची देखरेख करण्याकरिता बँकेत मला पाठवले असल्याचे सांगत आज अचानक माध्यमांशी संवाद साधला. या वेळी बोलत असताना त्यांनी संचालक मंडळ आणि चेअरमन यांच्यावर टीका केली. या उदयनराजेंच्या वक्तव्यावरती शिवेंद्रराजेंनी आक्रमक भूमिका घेत खा.उदयनराजेंवर जोरदार टीका केली. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेची चौकशी लागली नाही उदयनराजे यांना माहित नसावे ED ने जी माहिती मागवली ती जरंडेश्वर कारखान्यांना दिलेल्या फायनान्स Fianance बाबत ती दिली. जिल्हा मध्यवर्ती बँकेने जरंडेश्वर ची सर्व कागदपत्रे तपासून हे कर्ज दिले आहे. सध्या जरंडेश्वरचे सर्व हप्ते नियमित सुरू आहेत.

उदयनराजे जिल्हा मध्यवर्ती बँकेवर आरोप का करत आहेत माहिती नाही मागील काही दिवसापूर्वी जिल्हा बँकेची बैठक पार पडली त्यामध्ये त्यांनी बँकेला नावाजले होते. तुमच्या चॅनलने प्रसिद्धी दिली होती. यावेळी प्रसार माध्यमांना उदयनराजेंची मोबाईलवर असणारी मुलाखत त्यांनी दाखवली. या मुलाखतीत ते स्पष्ट म्हणाले बँक चांगली चालली आहे.

उदयनराजेंना पॅनल मध्ये का घेतले नाही या प्रश्नावर शिवेंद्रराजे यांनी मला माहीत नसल्याचे सांगत रामराजे, शरद पवार, अजित पवार (Sharad Pawar, Ajit Pawar) यांच्याशी त्यांनी बोलून घ्यावे. सातारा येथे काय होत आहे हे सर्व उदयनराजेमुळे होत असल्याचा टोमणा मारत साताराला ऑक्‍सिजनचा पुरवठा देवा कडून बंद होणार होता तो सुद्धा मी सुरू केलाला आहे असं सुध्दा ते वक्तव्य करतील असही ते म्हणाले. उदयनराजे यांची अँक्टिंग टिचकी वाजवून शिवेंद्रराजे यांनी उदयनराजे यांच्यावर टीका केली आहे. तसेच आपण त्यांच्यासारख्या अँक्टींग स्कुलमधून आलो नाही असं म्हणत उदयनराजेंना टोला लगावला.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aare Ware Beach : पावसाळ्यात 'आरे-वारे' बीचचं सौंदर्य फॉरेनपेक्षा कमी नाही

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री अजित पवार अहिल्यानगरमध्ये दाखल

Pune Rave Party: आधी हॉटेलची रेकी, नंतर आखला एकनाथ खडसेंच्या जावयाला अडकविण्याचा डाव; खेवलकरांच्या वकिलांचा धक्कादायक खुलासा

Beed Shocking : बीडमध्ये आणखी एक वैष्णवी जीवाला मुकली, सासरच्या छळाला कंटाळून २० वर्षीय विवाहितेने आयुष्य संपवलं

Rave Vs Party : पार्टी आणि रेव्हमध्ये काय फरक आहे?

SCROLL FOR NEXT