shivendra raje bhosale Saam tv
महाराष्ट्र

Video: सातारा APMC निवडणुकीत शिवेंद्रराजेंची हवा; विजयी मिरवणुकीत दंड ठोकून दिला उदयनराजेंना इशारा

shivendra raje bhosale news: सातारा कृषी बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या गटाने बाजी मारली.

ओमकार कदम, साम टीव्ही, सातारा

Shivendra raje bhosale News: राज्यात अनेक ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे निकाल लागले आहे. या निवडणुकीत अनेक प्रस्थापितांना धक्का लागला आहे. तर काही नेत्यांनी आपले गड राखले आहेत. तर सातारा कृषी बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या गटाने बाजी मारली. (Latest Marathi News)

सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक ही खासदार उदयनराजे यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला पाठिंबा देऊन प्रतिष्ठेची केली होती. या निवडणुकीत खासदार उदयनराजे यांनी पत्रकार परिषद घेऊन आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यानंतर आज या बाजार समितीचे निकाल लागले आणि ही बाजार समिती आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी एक हाती सत्ता मिळवत ताब्यात घेतली.

खासदार उदयनराजे भोसले आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना यांचा दणदणीत पराभव करत 18-0 अशी बाजी आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी मारली.

सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत निघालेल्या मिरवणुकीमध्ये आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी दंड थोपटून आणि वेगवेगळ्या पोझ देऊन विरोधकांना म्हणजेच खासदार उदयनराजेंना एक प्रकारे इशारा दिला आहे. यावेळेस मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते तालुक्यातून आल्याचे पाहायला मिळत होते.

काल निकालाआधीच शिवेंद्रराजे भोसले यांच्या समर्थकाने उधळलला गुलाल

सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत एकूण 93.86% विक्रमी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आमदार शिवेंद्रराजे यांची या बाजार समितीवर मोठ्या प्रमाणात पकड आहे. परंतु या वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आपले पॅनल उभे केले होते.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेला खासदार उदयनराजेंनी जाहीर पाठिंबा दिला होता. त्यामुळे सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक ही चुरशीची झाली. काल मतदान पार पडताच आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत निकाला आधीच विजयोत्सव साजरा केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दादर चैत्यभूमी कॅण्डल मार्च करणाऱ्या विद्यार्थींना पोलिसांनी घेतलं ताब्यात

Dalimb Benefits: रोज १ वाटी डाळिंब खा; हृदयापासून ब्लड प्रेशरपर्यंत शरीराला मिळतील ७ आरोग्यदायी फायदे

अंत्यसंस्कारावरून परतताना बस अन् ट्रकचा भीषण अपघात; 22 जणांचा मृत्यू, पाहा काळीज पिळवून टाकणारा VIDEO

किचनमध्ये कोणत्या दिशेला RO लावावं? दिशा चुकली तर होईल दुर्दशा

140KM वेगाचं भयानक 'अर्णब' चक्रीवादळ घडवणार विध्वंस; किनारपट्टीवरील राज्यांना अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT