kolhapur news Saam tv
महाराष्ट्र

विरोधात प्रचार का केलास? अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून शिवसैनिकाच्या घरात घुसून हल्ला

kolhapur politics : कोल्हापुरात अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून शिवसेना कार्यकर्त्याच्या घरात घुसून हल्ला केल्याची घटना घडली आहे. या घटनेने कोल्हापुरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे .

Vishal Gangurde

कोल्हापुरात निवडणुकीनंतर राडा

शिवसेनेच्या कार्यकर्त्याच्या घरात घुसून हल्ला

घरात घुसून हल्ला केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ

रणजित माजगावकर, साम टीव्ही

नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीनंतर राजकीय वातावरण अजूनही तापलेले असल्याचे चित्र कोल्हापुरात पाहायला मिळत आहे. शिवसेनेचा प्रचार केल्याच्या रागातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या काही कार्यकर्त्यांनी बोरवडे येथे संतोष शिंदे यांच्या घरात घुसून हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

संतोष शिंदे यांनी नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार केला होता. याच कारणावरून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या बोरवडे येथील काही कार्यकर्त्यांनी संतोष शिंदे यांच्या घरी जाऊन जाब विचारला.

“विरोधात प्रचार का केलास?” असा सवाल करत त्यांनी घरात घुसून गोंधळ घातल्याचा आरोप आहे. यावेळी घरात संतोष शिंदे यांची वयोवृद्ध आई एकट्या होत्या. संबंधितांनी त्यांना धक्काबुक्की करत मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याचेही सांगितले जात आहे. या प्रकारामुळे परिसरात भीती आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

संतोष शिंदे यांनी काय सांगितलं?

संतोष शिंदे यांनी सांगितलं की, 'मी पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेचा पदाधिकारी असल्याने माझ्या पक्षाच्या उमेदवाराचा कागलमध्ये प्रचार करत होतो. या कालावधित अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा प्रचार केल्याने जीवे मारण्याची धमकी दिली. निकाल लागल्यानंतर मी घरात नसताना फक्त वयोवृद्ध आई घरात असताना काही कार्यकर्त्यांनी घरावर भ्याड हल्ला केला. या हल्ल्याचा निषेध करतो. या हल्ल्याला शिवसेना स्टाइल प्रत्युत्तर देण्यात येईल'.

कोल्हापुरातील या घटनेवर गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आलेली नाही. तसेच यावर अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे यावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून काय प्रतिक्रिया येते, हे पाहावे लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT