Amravati Shivsena Todays News
Amravati Shivsena Todays News Saam TV
महाराष्ट्र

Amravati News : शिवसेनेला मोठा धक्का; ठाकरेंचा मावळा भाजपाच्या गोटात

साम टिव्ही ब्युरो

Amravati Shivsena Todays News : एकनाथ शिंदे आणि 40 हून अधिक आमदारांच्या बंडानंतर शिवसेनाला (Shivsena) धक्क्यावर धक्के बसत आहेत. नगरसेवकांपाठोपाठ शिवसेनेच्या तळागाळातील पदाधिकाऱ्यांनी सुद्धा शिंदे गटाची वाट धरली आहे. आज पुन्हा अमरावतीत शिवसेनेला एक मोठा धक्का बसला. अमरावती (amravati) शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेश वानखेडे यांनी भाजपात प्रवेश केलाय. (Amravati Todays News)

राजेश वानखेडे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत कमळ हाती घेतलं आहे. वानखेडे यांच्याबरोबर शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रदीप गौरखेडे, संजय देशमुखांसह तब्बल 36 पदाधिकाऱ्यांनी भाजपात प्रवेश केलाय.

दिवसेंदिवस पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते पक्षाला सोठचिठ्ठी देत असल्याने, एकीकडे पक्षाला बळ द्यायचं की शिवसैनिकांना पक्षांतरापासून वाचवायचं, अशी द्विधा परिस्थिती उद्धव ठाकरे यांच्या समोर उभी ठाकली आहे. (Amravati Shivsena News)

दरम्यान, वानखेडे यांनी भाजपमध्ये प्रवेश करणं हा शिवसेनेला बसलेला मोठा धक्का मानला जात आहे. कारण, वानखेडे यांची अमरावतीच्या तिवसा मतदारसंघात चांगलाच दरारा होता. वानखेडे यांनी तिवसा मतदारसंघातून काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांच्या विरोधात निवडणूक सुद्धा लढवली होती.

वानखेडे यांना आतापर्यंत एक कट्टर शिवसैनिक आणि मातोश्रीशी एकनिष्ठ असणारे कार्यकर्ते मानले जात होते. परंतु राज्यातील सत्तासंघर्षानंतर सध्याची परिस्थिती लक्षात घेता वानखेडेंनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Gold Silver Rate : सोन्याच्या भावात वाढ, चांदीची चकाकी उतरली; जाणून घ्या नवे दर

IPL Match Today : दिल्ली विरुद्ध मुंबईत घमासान, कोण जिंकणार? संभाव्य प्लेइंग इलेव्हन आणि पिच रिपोर्ट

Today's Marathi News Live : आपचे आमदार अमानतुल्ला खान यांना जामीन मंजूर

Prajakta Mali: अभिनेत्री अन् बिझनेस वूमन आहे प्राजक्ता माळी

Maharashtra Political : वर्षा गायकवाड यांच्या उमेदवारीवरून नसीम खान नाराज; MIMने दिली खुली ऑफर, आता काय निर्णय घेणार?

SCROLL FOR NEXT