Wardha News : मित्रासोबत दारू पिण्यासाठी गेला अन् जीव गमावून बसला; नेमकं काय घडलं?

पोलिसांनी संशयित आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
Wardha Crime News
Wardha Crime News Saam TV

चेतन व्यास, साम टिव्ही वर्धा

Wardha Crime News : शेळ्या चोरल्याचा संशयातून मित्रानेच मित्राची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार वर्धा (Wardha) जिल्ह्यातील सेलू तालुक्यात घडलाय. मित्राने अगोदर मित्रासोबत दारू ढोसली. त्यानंतर दारूच्या नशेत डोक्यात काठीने जबर प्रहार करून त्याला ठार केलं. ही घटना सेलू पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या खापरी शिवारात घडली. याप्रकरणी पोलिसांनी (Police) संशयित आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. (Wardha Todays News)

Wardha Crime News
Amravati News : अमरावती लव्ह जिहाद प्रकरणात नवा ट्विस्ट; पोलीस तपासात मोठी माहिती उघड

सुरेश देवराव आत्राम (४२) रा. वनग्राम चौकी, ता. हिंगणा जि. नागपूर असे मृतकाचे नाव आहे. तर अविनाश वासकर (२७) रा. खापरी ता. सेलू, असे अटक केलेल्या आरेपीचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, मृतक सुरेश आत्राम हा त्याच्या आई व पत्नीसह चौकी येथे राहायचा. आणि आरोपी अविनाश वासकर हा खापरी शिवारात राहायचा. ही दोन्ही गावे सिमेलगत असून दोघांच्याही शेती लागूनच असल्याने ते दोघेही चांगले मित्र होते.

मृतक सुरेशची आई चौकी येथील ब्रुहस्पती मंदिर परिसरात पुजेचे साहित्य विक्री करण्याचा व्यवसाय करते. मृतक सुरेश याने शेतातून शेळ्या चोरुन नेल्याचा संशय आरोपी अविनाशच्या मनात होता. याच संशयातून त्याने सुरेशचा काटा काढण्याचे ठरविले. अविनाशने सुरेशला त्याच्या खापरी शिवारात असलेल्या गोठ्याजवळ बोलाविले. दोघांनी तेथे दारु ढोसली.

थोडावेळा गप्पा गोष्टी करीत असतानाच मद्यधुंद अविनाशने सुरेशसोबत वाद करण्यास सुरुवात केली. तु माझ्या मालकीच्या शेळ्या का चोरुन नेल्या असे म्हणत शिवीगाळ करणे सुरु केले. सुरेशने शिवीगाळ करण्यास हटकले असता, अविनाशने गोठ्याजवळील बाभळीची काठी उचलून सुरेशच्या डोक्यावर रट्टे मारण्यास सुरुवात केली. (Wardha Selu Crime News)

Wardha Crime News
धक्कादायक! आईला शिवीगाळ करणाऱ्याची दगडाने ठेचून हत्या, दोघांना अटक

जवळपाच चार ते पाचवेळा सुरेशच्या डोक्यावर काठीने जोरदार रट्टे मारल्यानंतर रक्तबंबाळ अवस्थेत सुरेश अविनाशच्या तावडीतून जीव वाचवत पळाला. मात्र, शेतालगत काही अंतरावर असलेल्या नाल्याच्या बाजूला रस्त्यालगत सुरेश कोसळला आणि तेथेच पडून राहिला. याची माहिती सुरेशच्या नातलगांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून सुरेशला सावंगी येथील रुग्णालयात नेले.

मात्र, डॉक्टरांनी त्यास मृत घोषीत केले. दोघांत सुमारे १५ मिनिटे झटपट झाली. या झटपटीत सुरेशचे कपडे देखील फाटले. त्याच्या चपला, पॅन्ट घटनास्थळावरुन १०० मिटर अंतरावर पडून होत्या. त्यानंतर तो रस्त्याच्या दिशेने धावत गेला अन् तेथेच कोसळला.

घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके, उपविभागीय पोलीस अधिकारी पियूष जगताप, पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. फॉरेन्सिक विभागाच्या चमूने घटनास्थळी पडलेल्या रक्ताचे नमुने घेऊन ते प्रयोगशाळेत पाठविले.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com