Uddhav Thackeray Santosh Bangar Saam TV
महाराष्ट्र

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंकडून प्रचारसभांचा धडाका; आज हिंगोलीत ३ मोठ्या सभा घेणार; शिंदे गटाचं टेन्शन वाढणार?

Uddhav Thackeray News: आज उद्धव ठाकरे हिंगोली दौऱ्यावर असून संतोष बांगर यांच्या बालेकिल्ल्यासह तीन विधानसभा मतदारसंघात ३ मोठ्या सभा घेणार आहेत.

Satish Daud

Uddhav Thackeray in Hingoli

लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून महाराष्ट्रात ५ टप्प्यात मतदान पार पडणार आहे. यापार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांनी मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रचारसभांचा धडाकाच लावला आहे. त्यांच्या सभेला ठिकठिकाणी मोठा प्रतिसाद मिळत आहेत. दरम्यान, आज उद्धव ठाकरे हिंगोली दौऱ्यावर असून संतोष बांगर यांच्या बालेकिल्ल्यासह तीन विधानसभा मतदारसंघात सभा घेणार आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) स्वागतासाठी शिवसैनिकांनी जय्यत तयारी केली असून ते सभेत नेमकं काय बोलणार? याकडे संपूर्ण हिंगोलीकरांचं लक्ष लागून आहे. हिंगोली लोकसभा तसेच विधानसभा मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाच्या ताब्यात आहेत. याठिकाणी हेमंत पाटील खासदार असून संतोष बांगर आमदार म्हणून निवडून आलेले आहेत.

शिवसेनेच्या फुटीनंतर सर्वात शेवटी आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) आणि खासदार हेमंत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली होती. त्यानंतर वेळोवेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. आज हिंगोलीतील सभेत ठाकरे त्यांच्या दोन जुन्या शिलेदारावर नेमकं काय बोलणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. (Latest Marathi News)

एकीकडे महायुतीमध्ये जागावाटप सुरू असताना उद्धव ठाकरे यांनी अनेक लोकसभा मतदारसंघात सभा घेत उमेदवार घोषित केले आहेत. त्यामुळे आजच्या सभेत हिंगोली लोकसभा मतदारसंघातील देखील उमेदवाराच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे.

हिंगोली लोकसभेसाठी माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर, रुपाली पाटील गोरेगावकर, यांच्या नावांची जोरदार चर्चा आहे. माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांना देखील ठाकरे गटाकडून लोकसभेचं तिकीट दिलं जाऊ शकतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! आठव्या वेतन आयोगाचे नवे नोटिफिकेशन जारी, मुंबईत महत्त्वाची बैठक

Mumbai Flyover: मुंबईकरांचा प्रवास सुसाट! नवीन उड्डाणपूल लवकरच होणार सुरू, कुणाला होणार फायदा?

Maharashtra News Live Update: गिरीश महाजनांची कार्यतत्परता; अपघातग्रस्त ट्रक चालकाला स्वतः मदत करत बाहेर काढले

Pitru Paksha 2026: यावर्षी पितृपक्ष कधी आहे? जाणून घ्या तारीख आणि महत्व

Traffic Update : पुण्यात गणपती विसर्जनादिवशी वाहतुकीत मोठा बदल! महत्त्वाचे रस्ते राहणार बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग कोणते?

SCROLL FOR NEXT