Shiv Sena saam tv
महाराष्ट्र

Shiv Sena: शिवसेना कोणाची? सुप्रीम कोर्टात निकाल कधी लागणार, ठाकरेंच्या वकिलांनी वर्तवला अंदाज!

Supreme Court Hearing: शिवसेना पक्षाचं नाव, धनुष्यबाण चिन्ह आणि आमदार अपात्रता प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. अॅड. असीम सरोदे यांनी कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादातील महत्त्वाचे मुद्दे स्पष्ट करत निकाल दिवाळीपूर्वी येण्याची शक्यता व्यक्त केली.

Surabhi Jayashree Jagdish

शिवसेना पक्षाचं नाव, धनुष्यबाण चिन्ह आणि आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. गुरुवारी दुपारी २ वाजता या प्रकरणावर पुन्हा सुनावणी होणार आहे. त्याआधी प्रसिद्ध विधिज्ञ अ‍ॅड. असीम सरोदे यांनी बुधवारी झालेल्या सुनावणीतील महत्त्वाच्या घडामोडींवर भाष्य केलं.

अ‍ॅड. असीम सरोदे म्हणाले, "शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या बाजूने काल युक्तिवाद झाला. संविधानिक बदमाशी कशी झाली, हे काल कपिल सिब्बल यांनी सांगितलं. २०१४ आणि २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकांचा संदर्भ काल देण्यात आला. तिथून जे निवडून आले ते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या मान्यतेवर निवडून आलेले आहेत. उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व आहे."

गुवाहाटीतील बैठकीचा उल्लेख करत सरोदे म्हणाले, "गुवाहाटीमध्ये झालेल्या ठरावातसुद्धा उद्धव ठाकरे हे पक्षप्रमुख राहतील असं कागदपत्रे न्यायालयात दाखवण्यात आलं. मुख्य प्रतोद ठरवण्याचा अधिकार उद्धव ठाकरे यांनाच होता. मुख्य प्रतोद म्हणून एकनाथ शिंदे यांना काढून टाकण्यात आलं होतं."

आजच्या सुनावणीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार याबाबत सरोदे म्हणाले, "बहुमत चाचणीबाबतसुद्धा आज युक्तिवाद होणार आहे. राज्यपाल कोश्यारी यांनी दिलेला बहुमत चाचणीचा आदेश चुकीचा आहे. पुढील सुनावणीत एकनाथ शिंदे आणि निवडणूक आयोग त्यांची बाजू मांडतील."

निकालाबाबत काय म्हणाले सरोदे?

निकालाबाबत बोलताना सरोदे म्हणाले, "पुढील एक ते दीड महिन्यात पूर्ण निकाल समोर येईल. दिवाळीपूर्वी हा निकाल नक्की लागेल, अशी शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यांची प्रतिमा जपली पाहिजे."

शिवसेना कोणाची याकडे सर्वांचं लक्ष

दरम्यान शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह कोणाकडे राहणार तसंच आमदार अपात्रतेच्या प्रकरणात पुढे काय होणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. हे प्रकरण सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या विशेष खंडपीठासमोर सुरू आहे.

महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांनी एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांना अपात्र ठरवण्यास नकार दिला होता. त्या निर्णयाविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्याचबरोबर केंद्रीय निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गटाला अधिकृत 'शिवसेना' म्हणून मान्यता देत धनुष्यबाण चिन्ह दिल्याच्या निर्णयालाही आव्हान देण्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सीजेपी 'क्या बोलती पब्लिक' मोहीम राबवणार - अभिजीत दिपके

Shivsena: शिवसेना कुणाची? थोड्याच वेळात सुप्रीम कोर्टात सुनावणी; फेब्रुवारी २०२३ ते जुलै २०२६ मधील संपूर्ण घटनाक्रम वाचा

First Shravan Monday 2026 : श्रावणातील पहिला सोमवार कधी? पूजा कशी करावी आणि कोणती शिवमूठ वाहावी?

अमृता खानविलकरचा हटके अंदाज, स्कर्ट-टॉपमध्ये खुलून आलं सौंदर्य

Maharashtra Politics: मोठी बातमी! शिंदेसेनेला मोठं खिंडार, शेकडो पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT