Thackeray vs Shinde Supreme Court Hearing Today 
महाराष्ट्र

ठाकरे की शिंदे, शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण कुणाचा? आज पुन्हा महत्त्वाच्या सुनावणीकडे महाराष्ट्राचे लक्ष

Shiv Sena Party Symbol Hearing Updates : शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी होणार आहे. उद्धव ठाकरे गटाची बाजू कपिल सिब्बल मांडणार असून निवडणूक आयोगाच्या निर्णयावरील युक्तिवादाकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

Namdeo Kumbhar

Shiv Sena Supreme Court Hearing Today Live Update : शिवसेना पक्षनाव आणि अधिकृत 'धनुष्यबाण' चिन्ह नक्की कोणाचे? या महाराष्ट्रातील बहुचर्चित आणि राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या वादावर आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या गटाला खरी शिवसेना म्हणून मान्यता देत 'धनुष्यबाण' चिन्ह दिले होते. निवडणूक आयोगाच्या याच निर्णयाला उद्धव ठाकरे यांच्या गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यावर सुनावणी सुरू आहे.

कपिल सिब्बल ठाकरे गटाची बाजू मांडणार

सर्वोच्च न्यायालयाच्या विशेष खंडपीठासमोर ही सुनावणी सुरू आहे. मागील काही दिवसांपासून या प्रकरणाची लागोपाठ सुनावणी झाल्याने लवकरच निकाल लागेल, असे म्हटले जातेय. उद्धव ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ व वकील कपिल सिब्बल न्यायालयात जोरदार युक्तिवाद करणार आहेत. यापूर्वी झालेल्या सुनावण्यांमध्ये सिब्बल यांनी, विधिमंडळ पक्षातील फूट ही मूळ राजकीय पक्षातील फूट मानली जाऊ शकत नाही आणि निवडणूक आयोगाचा निर्णय कायदेशीरदृष्ट्या चुकीचा आहे, असा युक्तिवाद करत आयोगाच्या अधिकारांवरच प्रश्न उपस्थित केले होते.

नेमका वाद काय आहे?

केंद्रीय निवडणूक आयोगाने १७ फेब्रुवारी २०२३ रोजी आमदारांच्या संख्येचे (बहुमताचे) कारण देत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाला अधिकृत 'शिवसेना' म्हणून घोषित केले आणि धनुष्यबाण हे चिन्ह त्यांना बहाल केले. संघटनात्मक बहुमत, पक्षाची मूळ घटना आणि पक्षप्रमुखांचे अधिकार डावलून केवळ आमदार-खासदारांच्या संख्येवर पक्षाची मालकी ठरवता येत नाही, असा दावा ठाकरे गटाने याचिकेत केला आहे. त्यासोबतच शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांनी घेतलेल्या निर्णयालाही ठाकरे गटाने आव्हान दिले आहे.

महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या या अंतिम सुनावणीच्या निकालावर महाराष्ट्रातील आगामी राजकीय दिशा आणि दोन्ही गटांचे भवितव्य अवलंबून असणार आहे. त्यामुळे आज न्यायालयात काय युक्तिवाद होतो आणि न्यायालय काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT