शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे. खासदार हेमंत पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर आणखी एका नेत्याने आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी नाशिक मतदारसंघाचे खासदार हेमंत गोडसे यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा सुपूर्द केला आहे.
मराठा आरक्षणा बाबत समाजाच्या तीव्र भावना लक्षात घेता राजीनामा दिला असल्याचं ते म्हणाले आहेत. राज्य सरकारने निर्णय न घेतल्याने मराठा समाज नाराज असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली आहे. गोडसे यांचा राजीनामा मुख्यमंत्री शिंदे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
आपल्या राजीनामा पत्रात त्यांनी लिहिलं आहे की, ''नोकऱ्या मिळणेकामी मराठा समाजातील मुलांची मोठी कुचंबना होत आहे. गुणवत्ता असूनही फक्त आरक्षण नसल्याने विद्यार्थी प्रगतीपासून वंचित राहत आहेत. मराठा समाज सामाजिक व शैक्षणिक मागास नाही, असा अहवाल आयोगाने यापुर्वी दिलेला असला तरी याविषयी पुनः च एकदा फेरसर्वेक्षण होणे अत्यंत गरजेचे आहे.'' (Latest Marathi News)
गोडसे यांनी राजीनामा पत्रात म्हटलं आहे की, ''चार वर्षांपूर्वी समाजाच्या वतीने अवघ्या राज्यभर शांततामय मूक मोर्चे काढत आरक्षणाच्या मागणीकडे राज्यकर्त्यांचे लक्ष वेधले होते. दरम्यानच्या काळात आरक्षण मिळाल्याची घोषणा झाली असली तरी अगदी काही दिवसातच न्यायालयाच्या कसोटीवर आरक्षण बाद झाले. सर आपण मुख्यमंत्री झाल्यावर आपण आरक्षणाच्या मुद्यावर आपले लक्ष केंद्रित केले. आरक्षणाचा विषय आपण अतिशय उत्तम पद्धतीने हाताळत आहात. नुकत्याच झालेल्या दसरा मेळाव्याच्या सभेत आपण मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणार असल्याची शपथ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर घेतल्याने माझ्यासह राज्यातील तमाम मराठा समाजाच्या मनात विश्वासाची भावना निर्माण झालेली आहे. परंतु वेळेचं महत्व अनन्यसाधारण असतं.
त्यांनी यात पुढे म्हटलं आहे की, ''आरक्षणासाठी मागील महिन्याभरापूर्वी समाजाने पुन्हा तीव्र चळवळ अमरण उपोषण सुरू केले होते. दिलेल्या मुदतीत शासनाकडून आरक्षणाचा प्रश्न न सुटल्याने त्यांनी मागील आठवड्यापासून पुन्हा आरपारच्या लढाईसाठी समाजातील कार्यकर्त्यांनी विविध ठिकाणी आमरण उपोषण सुरू केलेले आहे. यामुळे राज्यभरातील तमाम मराठा समाजामध्ये आता आरक्षण मिळालेच पाहिजे, आता नाही तर कधीच नाही, अशी तीव्र भावना निर्माण झाली आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणास बसलेल्या जरांगे पाटलांची प्रकृती दिवसेंदिवस ढासाळत असल्याने मराठा समाजाच्या भावनांचा आता राज्यभर उद्रेक होऊ लागला आहे. मराठा समाजाच्या तीव्र भावना विचारात घेऊन मी आपल्या पक्षाचा लोकसभा सदस्य असल्यामुळे माझ्या खासदारकीचा राजीनामा आपणांकडे सादर करीत आहे.''
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.