PM JJBY: फक्त 36 रुपयांत मिळणार 2 लाखांचा फायदा; कोणती आहे 'ही' सरकारी योजना, जाणून घ्या...

PM Jeevan Jyoti Bima Yojana: फक्त 36 रुपयांत मिळणार 2 लाखांचा फायदा; कोणती आहे 'ही' सरकारी योजना, जाणून घ्या...
PM Jeevan Jyoti Bima Yojana
PM Jeevan Jyoti Bima YojanaSaam Tv
Published On

PM Jeevan Jyoti Bima Yojana:

देशात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांची संख्या खूप जास्त आहे. या लोकांना जीवनात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. हे लक्षात घेऊन केंद्र आणि राज्य सरकार अनेक योजना राबवत आहेत. यातच आज आम्ही तुम्हाला भारत सरकारच्या एका अतिशय जबरदस्त योजनेबद्दल सांगणार आहोत.

सरकारच्या या योजनेचे नाव प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आहे. भारत सरकारला जीवन ज्योती विमा योजनेद्वारे देशातील गरीब लोकांना जीवन विमा संरक्षणाशी जोडायचे आहे. भारत सरकारने 2015 मध्ये ही योजना सुरू केली. या विमा संरक्षण योजनेअंतर्गत एखाद्या व्यक्तीचा आजार किंवा अपघातामुळे मृत्यू झाल्यास नॉमिनीला 2 लाख रुपयांचे विमा संरक्षण दिले जाते. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

PM Jeevan Jyoti Bima Yojana
Salary Hike: 'या' मोठ्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी मिळणार मोठं गिफ्ट, 1 नोव्हेंबरपासून वाढणार पगार

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला वार्षिक 436 रुपये प्रीमियम भरावा लागेल. म्हणजेच तुम्हाला दरमहा सुमारे 36 रुपये वाचवावे लागतील आणि वार्षिक 436 रुपये प्रीमियम रक्कम जमा करावी लागेल.  (Latest Marathi News)

प्रीमियमची ही रक्कम 25 मे ते 31 मे दरम्यान बँक खात्यातून आपोआप कापली जाते. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा कालावधी 1 जून ते 31 मे दरम्यान आहे.

PM Jeevan Jyoti Bima Yojana
Gold Silver Price Today (30th October): सोन्याचा भाव गगनाला! महिन्याभरात ४००० रुपयांनी वाढ, जाणून घ्या आजचे दर

या योजनेचा लाभ 18 ते 50 वर्षे वयोगटातील व्यक्ती घेऊ शकतात. या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमचे बँक खाते असणे आवश्यक आहे. या योजनेची खास गोष्ट म्हणजे यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारची वैद्यकीय तपासणी करण्याची गरज नाही. या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी, तुमच्याकडे आधार कार्ड, ओळखपत्र, बँक खाते पासबुक, मोबाइल नंबर, पासपोर्ट आकाराचा फोटो इत्यादी कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com