Jalna Disputes Saam Tv
महाराष्ट्र

Jalna News: जालन्यात दोन गटात हाणामारी, वाद मिटवताना शिंदेंच्या आमदाराने एकाला चोपलं; पाहा VIDEO

Jalna Disputes Video: जालन्यामध्ये दोन गटात हाणामारी झाली. हा वाद मिटवण्यासाठी गेलेल्या आमदार अर्जुन खोतकर यांनी एकाला मारहाण केल्याची घटना समोर आली. याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

Priya More

Summary -

  • जालना बस स्थानक परिसरात दोन गटांमध्ये झालेल्या वादामुळे हाणामारी झाली.

  • शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी मध्यस्थी करत असताना एका व्यक्तीला चापट मारली.

  • घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून चर्चेचा विषय बनला आहे.

  • आमदाराने वाद मिटवण्याचा प्रयत्न केला पण त्यानंतर तणावाचे वातावरण निर्माण झाले.

जालन्यामध्ये दोन गटामध्ये झालेली हाणामारी मिटवण्यासाठी गेलेल्या शिवसेना आमदाराने एका व्यक्तीला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. अर्जुन खोतकर यांनी या व्यक्तीच्या कानाखाली मारली त्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी या व्यक्तीला चोप दिला. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून तो व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जालना शहरातील बस स्थानक परिसरात दोन गटात हाणामारी झाली. शिवसेना आमदार अर्जुन खोतकर पाहणी करत असताना दोन गटात हाणामारी झाली. पावसाच्या पाण्यात लाकडी साहित्य वाहून गेल्यामुळे आणि जुन्या वादामुळे एकमेकांवर आरोप करत दोन गटांमध्ये मारामारी झाली. यामुळे घटनास्थळावर मोठी गर्दी झाली होती आणि वाहतूक कोंडी देखील झाली होती.

यावेळी अर्जुन खोतकर यांनी वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी एक व्यक्ती जाब विचारत त्यांच्या दिशेने आला तर त्यांनी त्याच्या थोबाडीत चापट मारली. अर्जुन खोतकर यांनी त्या व्यक्तीला मारल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी देखील त्याला चोप दिला. घटनास्थळी उपस्थित असलेल्यांनी अर्जुन खोतकर यांचा हा व्हिडीओ काढला. जो सध्या जालन्यामध्ये चर्चेचा विषय बनला आहे.

या घटनेनंतर अर्जुन खोतकर यांनी माध्यमांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, 'जमवायला पांगवण्यासाठी आणि वाद मिटवण्यासाठी मी मध्यस्थी केली. एकाला हटवण्यासाठी मला चापट मारावी लागली.' अर्जुन खोतकर यांनी जमावाला शांत राहण्यास सांगितले. या घटनेमुळे घटनास्थळावर काही काळ तणावाचे वातावरण होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Songwriter Death: प्रसिद्ध गीतकाराचे निधन; राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास, संगीतविश्वात शोककळा

कोहिनूर हिऱ्याची किंमत किती आहे?

Local Bodies Election Supreme Court: ठरलं! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींबाबत सर्वात मोठी बातमी, या तारखेपर्यंत होणार निवडणुका | VIDEO

Jalna Heavy Rain : जालन्यात पावसाचा कहर; १५ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी, शेतीचे अतोनात नुकसान

Hardik Pandya Rumoured Girlfriend : हार्दिकच्या आयुष्यात स्टायलिश अभिनेत्रीची एन्ट्री? कोण आहे पंड्याची नवी गर्लफ्रेंड?

SCROLL FOR NEXT