Eknath Shinde On Uddhav Thackeray Saam Tv
महाराष्ट्र

Shivsena: ठाकरेंचा बालेकिल्ला ढासळणार? भास्कर जाधवांना टक्कर देण्यासाठी शिंदेंचा शिलेदार मैदानात

Latest Political News: गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी गुहागरकडे लक्ष केंद्रित करत उबाठाचे आमदार भास्कर जाधव यांना थेट टक्कर देण्याची तयारी सुरू केली आहे.

Bhagyashree Kamble

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील नेत्यांनी मैदानात उतरून मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. अशातच गुहागर मतदारसंघातही राजकीय हालचालींना वेग आला आहे. गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी गुहागर मतदारसंघावर लक्ष केंद्रीत करत आमदार भास्कर जाधव यांना थेट टक्कर देण्याची तयारी सुरु केली आहे.

अलिकडेच गुहागर मतदारसंघातील काही गावांमधील उबाठा गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यानंतर मंत्री योगेश कदम यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, "यापुढे गुहागर मतदारसंघातील प्रत्येक वाडी-वस्तीकडे माझं बारकाईने लक्ष राहणार आहे." त्यांनी असंही आश्वासन दिलं की, "जसा विकास दापोलीत झाला, तसाच विकास गुहागरमध्येही होणार आहे."

शिवसेनेचे नेते रामदास कदम आणि मंत्री योगेश कदम यांनी उबाठा आणि काँग्रेसला धक्का देत खेड परिसरात मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश घडवून आणला. यामुळे शिंदेंची शिवसेना अधिक बळकट झाली असल्याचं बोललं जात आहे.

२००९ मध्ये गुहागर मतदारसंघातून रामदास कदम यांचा पराभव झाला होता. आता याच गुहागर मतदारसंघावर योगेश कदम यांनी लक्ष केंद्रित केल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.

'आगामी काळात पक्षाची ताकद वाढवणार'

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदेंच्या शिवसेनेत सध्या इनकमिंग सुरू आहे. सध्या काँग्रेस आणि ठाकरे गटातील कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणात प्रवेश होत असून, पक्ष अधिक बळकट करण्यासाठी नवीन कार्यकारणी स्थापन करण्यात येत असल्याची माहिती आमदार निलेश राणे यांनी दिली.

शिवसेनेची जुनी कार्यकारणी रद्द करून नूतन कार्यकारणीची निवड करण्यात आली असून, यामार्फत पक्ष संघटन अधिक प्रभावीपणे उभारण्याचा प्रयत्न सुरू आहे. 'महायुतीचे नेते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल, मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आपली तयारी भक्कम असली पाहिजे,' असं सांगत निलेश राणे यांनी पक्ष विस्तारासाठी जोरदार तयारीचे संकेत दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: संगमनेरमध्ये स्कूल बसला अपघात

Accident: नामकरण सोहळ्यावरून परतताना काळाचा घाला, समृद्धी महामार्गावर भरधाव कार उलटली, एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

चाँद नवाबनंतर आणखी एक पाकिस्तानी पत्रकार चर्चेत! समुद्राच्या खोलीचं रिपोर्टिंग करताना थेट समुद्रात मारली उडी

Dragan Fruit Farming : माळरानावर फुलवली ड्रॅगन फ्रुटची शेती; येवल्याच्या दुष्काळग्रस्त भागात यशस्वी प्रयोग

Kitchen Hacks: काकडी कापण्यापूर्वी ती घासली का जाते? 'या' कारणांमुळे तुम्हीही कराल हा प्रयत्न

SCROLL FOR NEXT