Ramdas Kadam vs Aaditya Thackeray
Ramdas Kadam vs Aaditya Thackeray Saam Tv
महाराष्ट्र

आदित्य ठाकरेंच्या १०० खोक्यांची पोलखोल करू; शिंदे गटातील नेत्याचा इशारा

साम टिव्ही ब्युरो

जितेश कोळी, साम टिव्ही

Ramdas Kadam On Aaditya Thackeray : खेड (रत्नागिरी) : गेल्या काही दिवसांपासून '५० खोके एकदम ओके' अशा घोषणा देत विरोधक शिंदे सरकारला (Eknath Shinde) वारंवार डिवचण्याचा प्रयत्न करत आहेत. विशेषत: युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या निष्ठा यात्रेदरम्यान, शिवसैनिक ५० खोकेंच्या घोषणा देत आहेत. दरम्यान, याच मुद्द्यावरून शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय. (Shivsena Political Crisis)

शंभर खोके घेण्याची कुणाला सवय आहे, याची पोलखोल उद्याच्या (१८ सप्टेंबर) दापोली येथील सभेत करणार असल्याचा इशारा रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी आदित्य ठाकरेंना दिलाय. शिंदे गटाने दापोली येथे रविवारी (18 सप्टेंबर) जाहीर सभेचे आयोजन केले आहे. याच सभेत आदित्य ठाकरे यांच्या १०० खोक्यांबाबत पोलखोल करू असं रामदास कदम यांनी म्हटलं आहे.

शिवसेनेला जय महाराष्ट्र करत शिंदे गटात सामील झालेले रामदास कदम यांनी आज साम टिव्हीसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची दापोलीतील सभेत पोलखोल केली जाईल असा इशारा दिला. इतकंच नाही तर यावेळी रामदास कदम यांनी शिवसेना नेते भास्कर जाधव यांचा "चिपळूणचा नाच्या" असा उल्लेख करत त्यांच्यावरही जोरदार टीका केली. (Ramdas Kadam vs Aaditya Thackeray News)

शिंदे गटाने दापोली येथे रविवारी जाहीर सभेचे आयोजन केले आहे. शिंदे गटातील शिवसेना नेते रामदास कदम, उद्योग मंत्री उदय सामंत, आमदार भरत गोगावले, आमदार योगेश कदम हे प्रमुख नेते या सभेला संबोधित करणार आहेत.

काही दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे यांनी रत्नागिरीत सभा घेतली होती. यावेळी त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत '५० खोके एकदम ओके' अशा घोषणा दिल्या होत्या. आता शिंदे गटातील नेते उद्याच्या सभेत आदित्य ठाकरेंविषयी काय गौप्यस्फोट करणार हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : सोलापूरचं तापमान ४४.४ अंशावर, नागरिक उष्णतेने हैराण

Dehydration Treatment : 'या' ज्यूसचे सेवन केल्याने रखरखत्या उन्हात डि-हायड्रेशन पासून राहाल दूर

Sara Tendulkar चा वेस्टर्न आऊटफिटमध्ये हटके अंदाज

Sharad Pawar : जरा जपून, सरळ करायला वेळ लागणार नाही; शरद पवारांनी भर सभेत भरला आमदाराला दम

Ruchira Jadhav : मराठमोळा लूक अन् दाक्षिणात्य अंदाज, रुचिरा जाधवचं सुंदर फोटोशूट

SCROLL FOR NEXT