SHIV SENA PARTY SYMBOL CASE saam tv
महाराष्ट्र

शिवसेना पक्ष अन् चिन्ह कोणाचं? शिंदेंच्या वकीलाच्या युक्तिवादाने मोठा ट्विस्ट; सुप्रीम कोर्टात काय घडलं?

Shiv Sena Party and Symbol Row: शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह कोणाचे? सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचे वकील ध्रुव मेहता यांनी मोठा युक्तिवाद केला. व्हिपची वैधता, आमदार अपात्रता आणि विधानसभा अध्यक्षांच्या अधिकारांवर काय मांडणी झाली? जाणून घ्या सविस्तर.

Omkar Sonawane

शिवसेना फुटल्यानंतर पक्ष आणि चिन्ह निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांना दिले. निवडणूक आयोगाच्या ह्याच निर्णयाला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आलेय. गेल्या 3 वर्षांपासून या प्रकरणाची सुनावणी सुरू असून आता निकाल अंतिम टप्प्यात असल्याचे बोलले जात आहे. आज देखील सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. यावेळी शिंदे गटाचे वकील ध्रुव मेहता यांनी युक्तिवाद करताना मोठा दावा केला आहे. त्यामुळे या प्रकरणात ट्विस्ट निर्माण झाला आहे. तर शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी याधीची आपली बाजू मांडली आहे. दरम्यान आज सुप्रीम कोर्टात शिंदे गटाच्या वतीने युक्तिवाद करण्यात आला.

वकील ध्रुव मेहता यांनी आज सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद केला. 21 जून 2022 रोजी आमदारांच्या बैठकीत एकनाथ शिंदे यांची विधीमंडळ पक्षनेते म्हणून भूमिका कायम होती, भरत गोगावले यांची प्रतोद म्हणून नियुक्ती केली होती. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाचा व्हिप वैध आहे, असा युक्तिवाद यावेळी मेहता यांनी केला आहे. दरम्यान दहाव्या अनुसूचीअंतर्गत अपात्रतेचा निर्णय घेण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांना आहे, अध्यक्षांच्या निर्णयात त्रुटी असल्याचा हे प्रकरण पुन्हा अध्यक्षांकडे पाठवणे अपेक्षित आहे.

विधानसभेची मुदत संपल्यामुळे आता आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी निष्फळ ठरते, असा युक्तिवाद यावेळी मेहता यांनी सुप्रीम कोर्टात केला. यावेळी त्यांनी युक्तिवादादरम्यान राजेंद्रसिंह राणा आणि सुभाष देसाई प्रकरणाचा दाखला ही दिला.

तर विधानसभा अध्यक्षांना फक्त विद्यमान आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय घेता येतो, विधानसभा अध्यक्ष हे दहाव्या अनुसूचीअंतर्गत न्यायाअधिकारी म्हणून काम करतात, त्यांच्या निर्णयांना काही मर्यादा असतात. असा युक्तिवाद यावेळी मेहता यांनी केला आहे. आता या प्रकरणाची सुनावणी दिवाळीनंतर होणार आहे. त्यामुळे कोर्ट काय निर्णय देते हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Singer Divorce News : लग्नाच्या अवघ्या 4 वर्षातच प्रसिद्ध गायिकेने घेतला घटस्फोट, सोशल मीडिया पोस्टमधून सांगितलं खरं कारण

Maharashtra News Live Update: पुणे-बेंगळुरू महामार्ग ३० तासापासून ठप्प

Good News: मोठी बातमी! ८ लाख कर्मचाऱ्यांना दिवाळीचं मोठं गिफ्ट, महागाई भत्ता ५३ टक्क्यांनी वाढला; किती रुपये मिळणार?

Chanakya Niti : या ५ गोष्टींवर कधीही पैसे खर्च करू नका! चाणक्यांनी सांगितलं श्रीमंत होण्याचं गुपित

राज्य सरकारचा मोठा निर्णय; एकाचवेळी 1440 MBBS, विशेषज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती, काय म्हणाले शिंदे? VIDEO

SCROLL FOR NEXT