Saam Tv
महाराष्ट्र

Shivsena: शिवसेना कुणाची? थोड्याच वेळात सुप्रीम कोर्टात सुनावणी; फेब्रुवारी २०२३ ते जुलै २०२६ मधील संपूर्ण घटनाक्रम वाचा

Shiv Sena Symbol Row: शिवसेना पक्ष आणि चिन्ह कुणाचे यावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Priya More
  • शिवसेना चिन्हाप्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी

  • शिंदे विरुद्ध ठाकरे शिवसेना वाद कोर्टात

  • धनुष्यबाण चिन्हावर सुप्रीम कोर्ट काय निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष

शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे. महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात आणि निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या शिवसेना ठाकरे गटाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्ट थोड्याच वेळात निकाल देणार आहे. सुप्रीम कोर्ट नेमका काय निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर दोन गट पडले. एकनाश शिंदे यांनी भाजपसोबत जाऊन सत्ता स्थानन केली. त्यानंतर शिवसेना शिंदेगटाकडून शिवसेना पक्ष आणि चिन्हावर दावा केला. निवडणूक आयोगाने देखील एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निकाल देत शिवसेनापक्ष आणि चिन्ह शिंदेसेनेला बहाल केले होते. त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाने २०२४ मध्ये सुप्रीम कोर्टात धाव घेत याचिका दाखल केली. ठाकरेसेनेने केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय पूर्णपणे असंवैधानिक आणि पक्षपाती असल्याचा आरोप केला होता.

८ ऑक्टोबर २०२२ रोजी निवडणूक आयोगाने शिंदे-ठाकरे या दोन्ही गटाला धनुष्यबाण चिन्ह वापरण्यास बंदी घातली होती. त्यानंतर १७ फेब्रुवारी २०२३ रोजी निवडणूक आयोगाने धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिले आणि उद्धव ठाकरे यांना मशाल चिन्ह दिले. गेल्या ४ वर्षांपासून हे प्रकरण प्रलंबित आहे. ठाकरेसेनेच्या बाजूने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल कोर्टात बाजू मांडत आहेत. या प्रकरणाची सुनावणी आतापर्यंत अनेक वेळा पुढे ढकलण्यात आली. आज याप्रकरणावर सुप्रीम कोर्टात महत्वाच सुनावणी पार पडेल. कोर्ट नेमका काय निर्णय देतंय ते पाहणे महत्वाचे राहिल.

शिवसेना सुनावणीचा घटनाक्रम -

फेब्रुवारी 2023 - निवडणूक आयोगाकडून शिंदेसेनेस चिन्ह बहाल

23 फेब्रुवारी 2023 - ठाकरेसेनेकडून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल

23 फेब्रुवारी 2023 - सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास नकार

7 मे 2025 - सुप्रीम कोर्टाकडून तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नकार

14 जुलै 2025 - गेल्या 3 वर्षांपासून याचिका प्रलंबित

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skin Care: ऑक्टोबर हिटमुळे चेहरा ड्राय आणि काळा पडलाय? मग रात्री झोपण्यापूर्वी करा 'हा' सोपा उपाय

Monday Horoscope: या ४ राशींच्या लोकांनी आज पैशांच्या बाबतीत राहावे सावध; खर्च करताना घ्या विचारपूर्वक निर्णय

Navratri Look : गरबा-दांडियासाठी ट्रेंडी आउटफिट्स आयडियाज, पहा बेस्ट पर्याय

Rahul Gandhi : हातात संविधान घेत राहुल गांधींची मोठी घोषणा, उद्या सर्वांना दिल्लीला बोलवलं, कारणही सांगितले

ठाकरे कुटुंब पोलीस स्टेशनमध्ये; ठाकरे गटातील कार्यकर्ते आक्रमक, पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT