शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित यांना चेक बाऊन्स प्रकरणात 1 वर्षाची शिक्षा Saam TV
महाराष्ट्र

शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित यांना चेक बाऊन्स प्रकरणात 1 वर्षाची शिक्षा

एक वर्षाची शिक्षा आणि 1 कोटी 75 लाख रुपयाचा दंड ठोठावला आहे.

रुपेश पाटील

पालघर: पालघरचे (Palghar) शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित (Shivsena MP Rajendra Gavit) यांना चेक बाऊन्स केस प्रकरणात पालघर कोर्टाने एक वर्षाची शिक्षा आणि 1 कोटी 75 लाख रुपयाचा दंड ठोठावला आहे. शिवाय सदर दंड आणि शिक्षेला 18 मार्चपर्यंत स्थगिती ही देण्यात आली आहे. खासदार राजेंद्र गावित यांच्या विरोधात एका जमिनीच्या व्यवहार प्रकरणी 8 ऑक्टोंबर 2014 मध्ये पालघर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्याकडे चिराग बाफना यांनी दावा दाखल केला होता.

त्या दाव्याचा निकाल प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी विक्रांत खंडागळे यांनी दिला असून त्यानुसार पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांना एक वर्ष शिक्षा आणि 1 कोटी 75 लाख रुपयाचा दंड ठोठावला आहे. शिवाय या संदर्भात खासदार राजेंद्र गावित यांना अपिलात जाऊन निकालाविरोधात स्थगिती आणण्याची मुभा देण्यात आली आहे.

दरम्यान 2019 मा न्यायाल्यासमोर दोघा दोघां मध्ये तडजोड होऊन रक्कम देण्या संदर्भात करारनामा झाला होता यामध्ये गवितांनी अडीच कोटी रकमेचे एकूण 7 चेक दिले असून त्यापैकी 1कोटी वटले असून बाकी 25 लाखांचे 6 चेक बाऊन्स झाले आहेत. त्यानंतर 2020 मध्ये अंतरिम नुकसान भरपाई मिळावी म्हणून बाफना यांनी अर्ज केल्यानंतर त्या दाव्याचा निकाल प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी विक्रांत खंडागळे यांनी दिला असून त्यानुसार पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांना एक वर्ष शिक्षा आणि 1 कोटी 75 लाख रुपयाचा दंड ठोठावला आहे. शिवाय या संदर्भात खासदार राजेंद्र गावित यांना अपिलात जाऊन निकालाविरोधात स्थगिती आणण्याची मुभा देण्यात आली आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

माजी पंतप्रधानांच्या बहिणीवर महिलांचा हल्ला, भर पत्रकार परिषदेत अंडी फेकली, नेमकं कारण काय?

आताच तिकिट बुक करा! दिवळीआधी रेल्वेचं मोठं गिफ्ट, तब्बल ९४४ विशेष गाड्या धावणार, वाचा सविस्तर

Anant Chaturdashi 2025: विसर्जनाच्या दिवशी गणपती बाप्पा 'या' राशींना करणार मालामाल; अनंत चतुर्दशीला 4 शुभ महासंयोग देणार पैसा

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Mahadev Munde Case : महादेव मुंडे हत्या प्रकरणात कुटुंबीय असमाधानी; जरांगे पाटलांची घेणार भेट

SCROLL FOR NEXT