Shiv Sena MP Rajabhau Waje receives a warm welcome at the party’s anniversary event in Mumbai, reaffirming his loyalty to Uddhav Thackeray. saam tv
महाराष्ट्र

कोणतीही ऑफर नाही; पहिल्या दिवसापासून ठाकरेंसोबतच! शिवसेनेच्या निष्ठावंत खासदाराची ठाम भूमिका|VIDEO

Shiv Sena MP Rajabhau Waje Loyalty To Uddhav Thackeray: शिवसेनेतील फुटीनंतरही नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहण्याचा ठाम निर्णय घेतला. कोणत्याही ऑफरला न जुमानता त्यांनी आपली निष्ठा कायम ठेवली असून त्यांच्या भूमिकेची सध्या राज्यभर चर्चा सुरू आहे.

Omkar Sonawane

शिवसेनेच्या स्थापनेला आज 60 वर्ष पूर्ण होत असून त्याचवेळी ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. याच पार्श्वभूमीवर दोन्ही शिवसेनेचा वर्धपान दिन साजरा होत असून उद्धव ठाकरे काय बोलता याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ठाकरेसेनेचे 9 पैकी 6 खासदार सोडून गेल्यावर यामध्ये सर्वाधिक चर्चेत राहिले ते म्हणजे नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे. वाजे यांनी कुठल्याही आमिषाला बळी न पडता, सगळी लालच झुगारून आपल्या पक्षासोबत ठाम उभा राहिले. कोट्यवधी रुपयांची विकासकामांची ऑफर मिळूनही राजाभाऊ वाजे यांनी शिंदे गटात जाण्यास नकार दिला आणि त्यामुळे आता शिवसेना ठाकरे गटात अरविंद सावंत, अनिल देसाई आणि राजाभाऊ वाजे हे तीन खासदार आहेत.

शिवसेना ठाकरे गटाचा वर्धापनदिन हा मुंबई येथील सायनमध्ये षण्मुखानंद सभागृह येथे पार पडत असून या ठिकाणी राजाभाऊ वाजे येताच त्यांचे कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले. तसेच माध्यमाना प्रतिक्रिया देताना राजाभाऊ वाजे म्हणाले,माझ्या पर्यंत कोणी आलेल नाही आणि मी ही कोणाला संपर्क केलेला नाही तसेच जो पर्यंत खासदार आहेत तो पर्यंत मी उद्धव ठाकरे यांच्यासोबतच आहे असे राजभाऊ वाजे म्हणाले.

राजभाऊ वाजे यांना सोशल मीडियावर मोठी पसंती

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील सहा खासदारांनी पक्षाशी फारकत घेतल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या घडामोडींनंतर सोशल मीडियावरही त्याचे पडसाद उमटताना दिसत आहेत. एका बाजूला पक्ष सोडणाऱ्या खासदारांच्या सोशल मीडिया फॉलोविंगमध्ये घट होत असल्याची चर्चा सुरू असताना, दुसरीकडे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत ठामपणे उभे राहिलेले नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांच्या सोशल मीडिया खात्यांना अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे.

गेल्या दोन ते तीन दिवसांत खासदार राजाभाऊ वाजे यांच्या इन्स्टाग्राम आणि फेसबुक या दोन्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मिळून तब्बल ३० ते ४० हजार नव्या फॉलोअर्सची भर पडल्याची माहिती समोर आली आहे. पक्षनिष्ठा आणि ठाकरे कुटुंबाशी असलेली बांधिलकी यामुळे शिवसैनिक आणि ठाकरे समर्थकांकडून वाजे यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला जात असल्याचे चित्र दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT