shivsena political news Saam tv
महाराष्ट्र

काल एकनाथ शिंदेंनी डाव टाकला, आज आमदार उघडपणे बोलला; मित्रपक्षांना थेट ताकद दाखवली

shivsena political news : काल एकनाथ शिंदेंनी डाव टाकल्यानंतर आज आमदार उघडपणे बोलल्याचे समोर आलं आहे. वाचा नेमकं कोण काय म्हणाले?

Saam Tv

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिंदेसेने कंबर कसलीये

मुंबई, ठाण्याची जबाबदारी डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडे

एकनाथ शिंदे यांच्या निर्णयानंतर आमदार दळवी यांचं मोठं विधान

सचिन कदम, साम टीव्ही

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने आतापासूनच कंबर कसली आहे. शिवसेनेने काल राज्यातील लोकसभा मतदारसंघाच्या संपर्कप्रमुखांची घोषणा केली. यावेळी शिवसेनेने मुंबईसह ठाणे लोकसभेची जबाबदारी डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या खांद्यावर सोपवली आहे. या आगामी लोकसभा निवडणुकीबाबत शिंदे सेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे. आमदार दळवी यांनी थेट मित्र पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा इशारा दिला आहे.

आमदार महेंद्र दळवी यांनी रायगडमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी आमदार दळवी यांनी म्हटलं की, कोकणात सर्वात मोठा पक्ष आमचा आहे. त्यामुळे तो क्लेम आमचा आहे. येणार्‍या लोकसभेची तयारी आमचे नेते करत आहोत. आम्ही सर्व सज्ज आहोत. जिल्हा परिषदेत जे समीकरण झालं, ते आम्ही स्वीकारलं आहे. जागावाटपात आमचा दोन नंबर लागेल. आम्हाला चांगलं स्थान मिळालं नाही तर गेअर बदलण्याची ताकद आमच्यामध्ये आहे'.

अशोक खरात प्रकरणावरही दळवी यांनी भाष्य केलं. दळवी म्हणाले, 'ज्यांनी केलय त्यांना भोगाव लागणार आहे. खरातला पाठिंबा देणाऱ्या लोकांवरही कारवाई होणार आहे. अशोक खरातने महिलांवर अन्याय केला. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हळहळला आहे'.

मंत्री गोगावले यांचे पुत्र काय म्हणाले?

मंत्री तटकरेंवर होत असलेल्या आरोपांवर मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांनीही भाष्य केलं. आकाश चौधरी यांच्या सोबत असलेल्या मंत्री आदिती तटकरे आणि अनिकेत तटकरे यांच्या भागिदारीतील कंपन्यांविरोधात जिल्हा परिषद सदस्य विकास गोगावले यांनी मोठे विधान केलं. 'जयंत पाटील यांनी दिडशे कंपन्या सांगितल्या होत्या. त्या कंपन्या डिमॉलिश कुठे झाल्या. मी बोललो तर हेडलाईन बनेल, त्यामुळे तपासात समोर येईल, असे गोगावले म्हणाले. गोगावले यांच्या आरोपानंतर मंत्री आदिती तटकरे आणि अनिकेत तटकरे काय उत्तर देतात, हे पाहावे लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sleeping : झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम दूध प्यायल्याने खरंच गाढ झोप लागते का?

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

नाशिकमध्ये नवरात्रोत्सव काळाचा घाला! भरधाव कारची पोलिसांना धडक; PSI चा जागीच मृत्यू, ११ जण गंभीर जखमी

Plum Cake Recipe: विकेंडला घरच्या घरी बनवा मऊ, स्वादिष्ट आणि ड्रायफ्रूट्सने भरलेला प्लम केक, वाचा रेसिपी

Bhindi health benefits: भेंडी खाल्ल्याने शरीरात काय बदल होतात? तज्ज्ञ डॉक्टरांचा महत्त्वाचा सल्ला

SCROLL FOR NEXT