Shiv Sena MLA Disqualification Case Latest Updates: The MLA Disqualification Result is Likely To Come Before Time Saam Tv
महाराष्ट्र

Shivsena MLA Disqualification: आमदार अपात्रतेच्या निकालासंदर्भात मोठी अपडेट; 'या' तारखेला अंतिम निर्णय येणार?

Maharashtra 40 MLA Disqualification Case: शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. आमदार अपात्रतेचा निकाल वेळेआधीच लागण्याची शक्यता आहे.

Satish Daud

Maharashtra MLA Disqualification Case Update

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. आमदार अपात्रतेचा निकाल वेळेआधीच लागण्याची शक्यता आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सोमवारी सुनावणी घेताना तसे संकेत दिले आहेत. मंगळवारपर्यंत (१२ डिसेंबर) शिंदे आणि ठाकरे गटाची उलट साक्ष तपासणी संपवा, असे निर्देश त्यांनी दोन्ही गटातील वकिलांना दिले आहेत.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मागील काही दिवसांपासून आमदार अपात्रता प्रकरणाच्या कारवाईला वेग आला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर ठाकरे आणि शिंदे गटाच्या आमदारांची उलट तपासणी करीत आहेत. ठाकरे गटाचे (Uddhav Thackeray) प्रतोद सुनील प्रभू यांची साक्ष नोंदवण्यात आली आहे.

दुसरीकडे शिंदे गटाचे (Eknath Shinde) आमदार दिलीप लांडे, योगेश कदम, उदय सामंत, दीपक केसरकर आणि खासदार राहुल शेवाळे यांची साक्ष नोंदवण्यात आली आहे. आज म्हणजेच मंगळवारी शिंदे गटाचे आमदार दीपक केसरकर, राहुल शेवाळे आणि शेवटी भरत गोगावले यांची उलट साक्ष होणार आहे.

दोन्ही गटातील आमदारांची उटल तपासणी झाल्यानंतर १३ ते १५ डिसेंबर दरम्यान लेखी युक्तिवाद होणार आहे. त्यानंतर १६ ते २० डिसेंबर दरम्यान या प्रकरणाची अंतिम सुनावणी होण्याची शक्यता आहे. २० किंवा २१ डिसेंबर रोजी यावर अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती आहे.

दरम्यान, विधानसभा अध्यक्षांनी जारी केलेल्या निर्देशावर ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांनी नाराजी व्यक्त केली. माझी ६ दिवस उलट तपासणी झाली. इथे ३ दिवसांतच ५ ते ६ लोकांची चौकशी संपवा, असे निर्देश मिळत असतील तर हे बरोबर नसल्याचे त्यांनी म्हटले. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार ही सुनावणी वेळेत संपवा, अशी आमची मागणी असल्याचं ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hindi Langauge Row: हिंदी सक्तीच्या जीआरची होळी प्रकरणी २५० ते ३०० जणांवर गुन्हा; आंदोलनात उद्धव ठाकरे यांचीही उपस्थिती | VIDEO

Relationship Tips : महिलांच्या मनातलं कसं ओळखायचं?

Uddhav Thackeray Video: 'जय गुजरात'; नारा देताना उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडिओ, एकनाथ शिंदेंवरील टीकेनंतर शिवसेनेकडून व्हिडिओ व्हायरल

Pandharpur : विठुरायाच्या पद स्पर्शासाठी ५ किमीपर्यंत लांबच लांब रांगा | VIDEO

Maharashtra Live News Update: भारंगी नदीत वृद्धाने घेतली उडी; घटना सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद

SCROLL FOR NEXT