आज विधिमंडळात ड्रग्स व हुक्का बार यावर जोरदार चर्चा झाल्यानंतर बुलढाणा पोलीस ॲक्शन मोडवर आहेत. बुलडाणा पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने लोणार तालुक्यातील हत्ता गावात अनिल धुमा चव्हाण यांच्या शेतातील तुरीच्या पिकामध्ये लागवड केलेली चारशेच्या वर गांजाचे झाडे सापडली आहेत.
पोलिसांना गुप्त माहिती मिळताच तात्काळ पोलिसांनी ही कारवाई केली. पोलिसांचे पथक या शेतात असून कारवाई सुरू आहे. गेल्या पाच वर्षात विदर्भातील ही सर्वात मोठी कारवाई कारवाई असल्यच बोलले जात आहे.
नागपुरातील विधानभवनात हिवाळी अधिवेशन सुरु आहे. या विधानभवनाकडे जाणारी रोहित पवार यांची संघर्ष यात्रा पोलिसांनी अडवली आहे. रोहित पवारांची संघर्ष यात्रा अडवण्यास पोलिसांना यश आलं आहे. मात्र, यात्रा अडवल्याने रोहित पवार यांच्या समर्थकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. यावेळी पोलिसांनी रोहित पवारांना ताब्यात घेतलं आहे.
सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (CBSE)ने इयत्ता १० वी आणि १२ वी बोर्डाच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार इयत्ता दहावीची परीक्षा १५ फेब्रुवारीपासून सुरू होईल आणि १३ मार्च रोजी संपेल. तर इयत्ता १२ वीची परीक्षा १५ फेब्रुवारीपासून सुरू होईल आणि २ एप्रिल २०२४ ला संपेल.
नांदेडमध्ये ७ जानेवारी २०२४ रोजी छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत ओबीसी महामेळावा.
प्रकाश आंबेडकर, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारमय्या यांनाही निमंत्रण
मनोज जरांगे- पाटील यांच्या सभांना उत्तर देण्यासाठी ओबीसी समाजातर्फे मंत्री छगन भुजबळ यांच्या सभांचे आयोजन
अंबरनाथमध्ये पहिल्या मजल्यावरील गॅलरीचा स्लॅब कोसळला
कानसई गावातील शिवम इमारतीतील दुर्घटना
सुदैवाने कुठलीही जीवितहानी नाही
अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी
दिशा सालियन प्रकरणाच्या चौकशीसाठी राज्य सरकारच्या आदेशानंतर एसआयटी स्थापन
नॉर्थ रीजनचे अप्पर पोलीस आयुक्त राजीव जैन करतील नेतृत्व
परिमंडळ ११ चे पोलीस उपायुक्त अजय बंसल आणि मालवणी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चिमाजी आढाव एसआयटीत असणार
शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नसेल तर मराठा आरक्षणासाठी पुढाऱ्यांना ज्या पद्धतीने गाव बंदी करण्यात आली होती, त्याच पद्धतीने स्वाभिमानी शेतकरी संघटना देखील शेतकऱ्यांना सोबत घेऊन पुढील काळात असेच आंदोलन करेल, असा इशारा रविकांत तुपकर यांनी सरकारला दिलाय.
जुनी पेन्शन लागू करण्याची कर्मचाऱ्यांची मागणी
जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी गुरूवारपासून राज्यव्यापी संप
पुण्यातील चांदणी चौक परिसरात एक थरकाप उडवणारी घटना घडली. शाळकरी विद्यार्थ्यांना घेऊन जात असलेल्या रिक्षाला डंपरने जोरदार धडक दिली. या घटनेत रिक्षातील ५ विद्यार्थी जखमी झाले आहेत. हे सर्व विद्यार्थी एमआयटी ग्रुप स्कुलमधील असल्याचं सांगितलं जातंय. यातील तीन विद्यार्थ्यांना एशियन हॉस्पिटलमध्ये तर एका विद्यार्थ्याला दुसऱ्या खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत
मिळालेल्या माहितीनुसार, शाळा सुटल्यानंतर ही रिक्षा विद्यार्थ्यांना घेऊन मुंबई बेंगळुरू महामार्गावरून जात होती. त्यावेळी भरधाव असलेली रिक्षा भुयारी मार्गात डंपरला जाऊन धडकली. रिक्षा चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत विद्यार्थ्यांना रुग्णालयात हलवले
नेहमी आपल्या वादग्रस्त वक्तव्याने चर्चेत असलेल्या कालिचरण महाराजांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे. राममंदिर उद्ध्वस्त व्हावे हे मुस्लिमांचे मनसुबे आहेत. २० वर्षानंतर त्यांची संख्या वाढली तर ते तसं करतील, महंतांनी देखील भीती व्यक्त केली आहे. असं कालिचरण महाराज यांनी म्हटलं आहे. कालिचरण महाराज पुण्याच्या भोरमधील बनेश्वर मंदिरात महाआरतीसाठी आले होते. यावेळी त्यांनी हे वादग्रस्त विधान केलं आहे.
राज्यावर एकीकडे अवकाळी पाऊस आणि दुष्काळाचं सावट असताना दुसरीकडे शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. कारण, पांढरं सोन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कापसाला यंदाही खूपच कमी भाव मिळत आहे.
सद्य:स्थितीत परभणी जिल्हात कापसाची ५ ते ६ हजार रुपये प्रतिक्विंटल इतक्या दराने विक्री होत आहे. उत्पादन खर्च देखील निघत नसल्याचे असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. जिल्हात गेल्या महिन्यात सहा दिवस अवकाळी पाऊस झाला.
रब्बी हंगामासाठी जमिनीत ओलावा वाढल्याने अवकाळीचा पाऊस पोषक ठरला. त्याचवेळी वेचणी राहिलेल्या शेतासाठी पाऊस घातक ठरला आहे. या पावसाने फुटलेला कापूस भिजला, काही ठिकाणी खाली पडल्याने प्रतवारी खराब झाली आहे. शिवाय हा कापूस भिजला असल्याने व्यापारी आता कमी भावात मागत आहेत.
शेतक-यांनी महामार्ग अडवून रास्तारोको करण्यास सुरुवात केली आहे. नगर मनमाड महामार्गावर रास्तारोको करण्यात आलाय. राहुरी बाजार समितीसमोर रस्ता अडवण्यात आलाय. केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात शेतकरी आक्रमक झाले असून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात हे आंदोलन होत आहे.
रस्त्यावर भजन गात शेतकऱ्यांनी सरकारला जाग आणण्याचा प्रयत्न केलाय. कांदा निर्यात बंदी मागे घ्या, इथेनॉल उत्पादनावर घातलेली बंदी मागे घ्या, दुधाला भाव द्या मागणीसाठी रास्तारोको केला जातोय. शेतक-यांसह स्वाभिमानीचे कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी आहेत.
दिशा सालियन मृत्यू प्रकरणात भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. कुणी अडचणीच्या गोष्टी केल्या असतील, तर अडचणीत येतील. कुणाला अडचणीत आणायचा आमचा अजिबात उद्देश नाही. दिशा सालियनची आत्महत्या ही संशयाच्या भोवऱ्यात अडकलेली आहे, असं प्रवीण दरेकर म्हणाले.
दिशा सालियनने आत्महत्या नेमकी कशामुळे केली, प्रकरण दडपलं का? अशा प्रकारचे वेगवेगळे आरोप झालेले आहेत. जनतेच्या मनात असा संभ्रम जर असेल, शंका असतील तर ही सत्यस्थिती बाहेर आली पाहिजे. त्यामुळे चौकशीचं स्वागत करतो, असंही दरेकर यांनी म्हटलं आहे.
पुणे जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला, त्यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक पुणे दौऱ्यावर येणार आहे. पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर विभागीय आयुक्त कार्यालयात ११ वाजता घेणार बैठक घेतली जाणार आहे. तसेच उद्या पथक बारामती आणि पुरंदर तालुक्यांमध्ये प्रत्यक्षात जाऊन करणार पाहणी
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आज पुन्हा दोन तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. दुपारी १२ ते २ वाजेपर्यंत महामार्गावर गॅन्ट्री बसविण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व प्रकारची अवजड वाहतूक तसेच छोटी वाहने कुसगाव टोलनाक्यावरून जुना मुंबई-पुणे महामार्गाने पुणे दिशेला वळविण्यात येणार आहे. वाहनचालकांनी सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे.
महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष आनंद निरगुडे (निवृत्त) यांनी मागासवर्ग आयोगाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यामुळे मागासवर्ग आयोग बरखास्त होण्याची शक्यता आहे. शासकीय हस्तक्षेपामुळे त्रस्त होऊन नंद निरगुडे राजीनामा दिला असल्याची माहिती आहे.
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज चौथा दिवस आहे. राज्यातील अवकाळीच्या मुद्द्यावर आज सकाळी नऊ वाजल्यापासून १०.४५ वाजेपर्यंत पुन्हा चर्चा केली जाईल. याशिवाय राज्यात गेल्या काही दिवसांपासून पेटलेल्या मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आज वादळी चर्चा अपेक्षित आहे.
दरम्यान, या आरक्षण व अवकाळी या दोन मुद्द्यांव्यतिरिक्त राज्यातील वाढते प्रदूषण, वाहनांचे वाढते अपघात आणि रुग्णालयांतील प्रश्नांवर ही आजच्या कामकाजात चर्चा होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा आज वाढदिवस असून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी अजित पवार जाणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.