संजय डाफ
शिवसेनेचे (Shivsena) नागपूर (Nagpur) सह संपर्क प्रमुख आणि माजी नागपूर जिल्हा अध्यक्ष शेखर सावरबांधे (Shekhar Savarbandhe) यांनी शिवसेनेला रामराम ठोकला आहे. निर्णय प्रक्रियेत डावललं जातं असल्याचा आणि पक्ष वाढीसंदर्भात कुठलेही निर्णय घेतले जात नसल्याचा आरोप सावरबांधे यांनी केला आहे.
हे देखील पहा-
आज दुपारी 3.30 वाजता राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. तक दूसरीकडे सेनेच्या पदाधिकाऱ्याने अचानक पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्याने सेनेमध्ये खदखद व्यक्त केली जात आहे. शेखर सावरबांधे यांना नागपूरचे माजी उपमहापौर म्हणूनही ओळखले जाते. त्यांची विदर्भातील शिवसेनेवर त्यांची मजबूत पकड होती.
खरंतर विदर्भ हा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा बालेकिल्ला असल्याने विदर्भात शिवसेनेची ताकद कमी आहे. मात्र शिवसेनेचे विदर्भाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिक शिवसैनिक सातत्याने करत असतात. नागपूर महापालिकेची निवडणूकीला काहीच दिवस राहिले असताना सावरबांधे यांनी रामराम ठोकल्याने शिवसेनेला याचा मोठा फटका बसणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाल्या आहेत.
Edited By- Anuradha
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.