BJP leader Chandrakant Patil’s remark — “Shiv Sena is Thackeray’s, NCP is Pawar’s 
महाराष्ट्र

Chandrakant Patil: 'शिवसेना ठाकरेंची,राष्ट्रवादी पवारांची'; सुप्रीम कोर्टाआधीच चंद्रकांत पाटील यांचा निकाल

Chandrakant Patil Statement On NCP And Shiv Sena: भाजपच्या चंद्रकांत पाटलांनी केलेल्या एका वक्तव्यानं मित्रपक्षांना मोठा धक्का दिलाय. होय. शिवसेना आणि राष्ट्रवादीबद्दल चंद्रकांत पाटलांनी काय दावा केला आणि त्याचे महायुतीत कसे पडसाद उमटले पाहा.

Snehil Shivaji

12 नोव्हेंबर 2025 ला सुप्रिम कोर्टात होणारा सर्वात मोठा फैसला भाजपचे नेते आणि राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटलांनी आधीच सुनावला. आणि चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्यानं मात्र महायुतीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. असं नेमकं चंद्रकांत पाटील काय म्हणाले ऐका

चंद्रकांत पाटलांनी भाजपची महती सांगतांना मित्रपक्षांच्या खरेपणावरच थेट सवाल केलाय. चंद्रकांत पाटलांनी हे वक्तव्य केल्यानंतर राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त करण्यात आलं. परंतू चंद्रकांतदादांनी महायुतीतील मित्रपक्षांनाच निवडणूकांच्या आधी थेट पक्ष कोणाचा म्हणत टार्गेट करुन विरोधकांचं कौतुक केल्यानं मित्रपक्षांनीही संताप व्यक्त केलाय.

गेल्या ३ वर्षांपासून शिवसेना आणि राष्ट्रवादी हे पक्ष कोणाचे याचा वाद सुप्रिम कोर्टात सुरुये. आता 12 नोव्हेंबर 2025 ला याप्रकरणी अंतिम निकाल येणारेत. परंतू त्याआधीच चंद्रकांतदादांनी थेट शरद पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंची शिवसेना म्हणत शिंदे आणि अजित पवारांना चेतावणी दिल्याचं म्हटलं जातंय.

कोल्हापूरातून चंद्रकांत दादा थेट पुण्यात आले आणि त्यांनी अजित पवारांना चॅलेंज द्यायला सुरुवात केली. परंतू कालांतराने अजित पवारच महायुतीत आल्यानं चंद्रकांत पाटलांना पालकमंत्री पदाची सुत्र अजित पवारांच्या हाती द्यावी लागली. महायुतीत असूनही धंगेकरांनी चंद्रकांत दादांविरोधात बंड पुकारल्यानं चंद्रकांत दादांनी निवडणूकांच्या आधीच थेट ओरिजनल पक्ष कोणाचा हे सांगून एकाच दगडात 2 पक्ष तर मारले नाही ना अशीच चर्चा सध्या राज्याच्या राजकारणात सुरु झालीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : बापाची हत्या केली अन् मृतदेह घरातच पुरला, दुर्गंधीनंतर लेकाचं बिंग फुटलं, संभाजीनगर हादरलं

Sunday special horoscope: आजचा दिवस नशीब उजळणारा! या राशींना मिळणार कामात प्रगती आणि आर्थिक लाभ

Pune News: प्रामाणिक अंजूताई! मालकाचा शोध घेत परत केली सापडलेली 10 लाख रुपयांची बॅग

Maharashtra Politics: साताऱ्यात एकनाथ शिंदेंना धक्का, लाडक्या बहिणीनं सोडली साथ; अजित पवारांच्या राष्ट्रवादीत एन्ट्री

मोठी बातमी! जिल्हा परिषदेच्या निवडणुका लांबणार, अजित पवारांनी दिले संकेत, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT