Shiv Sena workers join NCP in Khopoli amid rising internal tensions in the party. x
महाराष्ट्र

Maharashtra Politics: शिवसेनेतील नाराजी उफाळली; शिवसैनिकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

Konkan Politics: शिवसेनेतील अंतर्गत संघर्षामुळे खोपोलीमध्ये कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील झाले आहेत. ज्यामुळे एकनाथ शिंदे आणि स्थानिक नेतृत्वाला मोठा राजकीय धक्का बसला.

Bharat Jadhav

  • खोपोलीत शिवसैनिकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

  • शिवसेनेतील अंतर्गत वाद उफाळला

  • स्थानिक राजकारणात मोठी उलथापालथ

साताऱ्यानंतर खोपोलीतही शिवसेनेतील अंतर्गत वाद उफाळून आला असून शिवसैनिकांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांनी खोपोलीत योग्य फिल्डींग लावत थोरवे यांच्या जवळचे लोक फोडलेत. शिवसेनेतील अंतर्गत नाराजीचा फायदा उचलत शिवसेनेला मोठा धक्का दिला आहे.

शिवसैनिकांच्या राष्ट्रवादी पक्ष प्रवेशामुळे आमदार थोरवेंसह एकनाथ शिंदेंना जबर धक्का बसला आहे. आमदार थोरवे सतत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरेंवर टीका करतात. आता सुधाकर घारे यांनी आमदारांच्या मतदारसंघातच महेंद्र थोरवे यांचाच करेक्ट कार्यक्रम केला आहे. शिवसैनिकांच्या पक्ष प्रवेशावेळी जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुनील पाटील, तालुकाध्यक्ष संतोष बैलमारे, कर्जतचे तालुकाध्यक्ष दीपक श्रीखंडे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

खोपोली नगरपालिकेच्या निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेकडून नगरसेवकपदाची निवडणूक लढवून पराभूत झालेल्या काही उमेदवारांसह प्रमुख पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. खासदार तटकरे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले आहे. तर या प्रवेशासाठी सुधाकर घारे यांनी प्रवेशासाठी फिल्डिंग लावल्याचे बोलले जात आहे.

यासह नगरपालिकेची निवडणूक जिंकल्यानंतर शिवसेना शिंदे गटात अंतर्गत वाद होऊ लागले. यामुळे महेंद्र थोरवे यांच्या जवळचे सहकाऱ्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. हा प्रवेश आता थोरवे यांच्यासह शिवसेनेला मोठा धक्का मानला जातोय.

दरम्यान सुधाकर घारे यांनी विधानसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढवली होती. या निवडणुकीत सुधाकर घारे यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. यानंतरच सुधाकर घारे यांना नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी कंबर कसली होती. पण तेथेही त्यांना यश आले नाही. ज्यानंतर त्यांनी खोपोलीकडे पक्षबांधणी आणि पक्ष प्रचारावर भर दिला. आता त्यांनी थेट मित्र पक्ष असणाऱ्या शिंदेंच्या शिवसेनेलाच सुरूंग लावले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Good News: नवी मुंबई पालिका कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, दिवाळी बोनस जाहीर; खात्यात येणार इतके पैसे

Flight Fare Hike : विमान प्रवास महागला, दिवाळीपूर्वी तिकिटाच्या दरात ४ पटीने वाढ, प्रवासासाठी किती मोजावे लागणार?

Gautami Patil : एक लाजरा न्‌ साजरा मुखडा...; गौतमी पाटीलचा आजवरचा सर्वात सुंदर लूक, फोटो तुम्हीही पाहाल तर...

Maharashtra News Live Update: विमान प्रवासाच्या मनमानी विमान तिकीट दरांना लगाम लागणार

Maharashtra Politics: शिंदेंच्या आमदाराकडून राष्ट्रवादीच्या नेत्याला जीवे मारण्याची धमकी, राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT