Shock to Shinde Sena in Solapur Saam Tv News
महाराष्ट्र

शिंदे गटाला पश्चिम महाराष्ट्रात धक्का; माजी मंत्र्यांच्या बंधूंचा तडकाफडकी राजीनामा; पत्रात सांगितली मनातली खदखद

Shock to Shinde Sena in Solapur: स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सोलापूरात शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे. जिल्हाप्रमुख प्रा. शिवाजीराव सावंत यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे.

Bhagyashree Kamble

  • स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सोलापूरात शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे.

  • जिल्हाप्रमुख प्रा. शिवाजीराव सावंत यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे.

  • पक्षश्रेष्ठींनी आपल्याला विश्वासात न घेतल्याचा आरोप सावंत यांनी केला आहे.

  • सावंत हे माजी मंत्री तानाजी सावंत यांचे बंधू असून जिल्ह्यात प्रभावशाली नेते आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना अवघे काही महिने शिल्लक असताना सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चाबांधणी सुरू केली आहे. काही ठिकाणी फोडाफोडी, काही ठिकाणी उलथापालथ, तर काही ठिकाणी नाराजीनाट्य सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर सोलापुरात शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे. शिंदे गटातील नेते आणि जिल्हाप्रमुख प्रा.शिवाजीराव सावंत यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे.

शिवसेना शिंदे गटातील नेते आणि जिल्हाप्रमुख प्रा.शिवाजीराव सावंत हे गेल्या काही दिवसांपासून नाराज असल्याची चर्चा आहे. त्यांनी नुकतंच तडकाफडकी राजीनामा दिला आहे. यावेळी त्यांनी राजीनामा देण्यामागचं कारण सांगितलं आहे. 'मला विश्वासात न घेता जिल्ह्यातील अनेक पदाधिकाऱ्यांच्या नेमणूक झाल्या आहेत', असं सावंत म्हणाले.

तसेच 'सोलापूर तालुक्यातील तालुका प्रमुख आणि शहर प्रमुखांच्या नेमणूक ही विश्वासात न घेता करण्यात आल्या आहेत. पक्ष श्रेष्ठांचा विश्वास नसल्यानं पदाचा राजीनामा देत आहे', असंही सावंत म्हणाले. त्यांनी पत्र लिहून राजीनामा देण्यामागचं कारण स्पष्ट केलं.

प्रा.शिवाजीराव सावंत हे माजी मंत्री तानाजी सावंत यांचे मोठे बंधू आहेत. तसेच सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत. सावंत सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातील भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचा कार्यभारही सांभाळतात. नुकतंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मंत्री तानाजी सावंत यांची भेट घेतली होती.

शिंदेंनी तानाजी सावंत यांची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं. तानाजी सावंत यांची मंत्रिमंडळात वाईल्ड कार्ड एन्ट्री होणार का? असे अनेक प्रश्न राजकीय वर्तुळात रंगू लागले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO Rule: EPFOचे ८ नियम बदलले; कर्मचाऱ्यांच्या खिशावर थेट होणार परिणाम

KDMC निवडणुकीपूर्वी वातावरण तापलं; २७ गावांचा प्रश्न पेटला, स्वतंत्र नगरपालिकेची मागणी

दादरमधील स्टार मॉलला भीषण आग; अग्निशमन दलाचं बचावकार्य सुरू|VIDEO

Maharashtra Live News Update: पनवेल ते सीएसएमटीला जाणाऱ्या लोकलमधून तरुण पडला

Maharashtra Politics: काँग्रेसला मोठा धक्का; बड्या नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश, सोलापुरातील राजकारणात उलाथपालथ

SCROLL FOR NEXT