Shiv Sena Dasara Melava Saam Tv
महाराष्ट्र

Dasara Melava : आझाद शिवसेनेचा आझाद मेळावा आझाद मैदानावर होतोय; CM शिंदेंनी सांगितलं दसरा मेळावा शिवतीर्थावर का नाही?

Dasra Melava 2023 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरोधकांवर कोणत्या विषयावरून टीकेचे बाण सोडतील.

Bharat Jadhav

Shiv Sena Dasara Melava :

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्यासाठी हजारो शिवसैनिक लोकल रेल्वेने मुंबईत दाखल झाले आहेत. राज्यभरातील शिवसैनिकांना शुभेच्छा देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाकरे गटावर प्रहार केला.

महाराष्ट्रातून आलेल्या शिवसैनिकांची भगवी लाट पाहायला मिळतेय. मीडियाच्या मित्रांना विनंती आहे हे की, आपण वाहिन्यांच्या माध्यमामातून लोकांना दाखवा. लोकांना कळू द्या समोरच्यांना...शिवसेना कुठंय...बाळासाहेबांची शिवसेना कुठंय...

बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद दिघे साहेब यांनाही मी वंदन करतो. आजचा हा मेळावा आझाद शिवसेनेचा आझाद मेळावा आझाद मैदानावर होतोय. आझाद मैदानालाही इतिहास आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातला इतिहास आहे. स्वातंत्र्याचा इतिहास आहे. अशा आझाद मैदानावर शिवसेनेचा दसरा मेळावा होतोय. आपण बाळासाहेबांचा विचार खाली पडू दिला नाही. कुठे बाळासाहेबांचे विचार ...कुठे सत्तेसाठी लाचार लोक.

..हे आहे आमचे शिवतीर्थ

बाळासाहेबांचे विचार तेच आमच्यासाठी शिवतीर्थ आहे. या राज्यात सुख शांती असली पाहिजे. म्हणून गेल्या वर्षी बीकेसीला मेळावा घेतला. काही म्हणाले तुम्ही शिवाजी पार्क सोडायला नको होता. इथे बाळासाहेबांचे विचार बिनधास्तपणे मांडता येतात. तेच आपले शिवतीर्थ, असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. मुख्यमंत्री शिंदेंनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला. बाळासाहेबांच्या विचारांना तुम्ही मूठमाती कधीच दिलीय. बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम, बेइमानी तुम्ही केली.

लाचारीसाठी कोणाला मिठी मारतील

काँग्रेस, समाजवादी, एमआयएम, कुणाला डोक्यावर, कुणाला खांद्यावर घेतील काही सांगता येत नाही. हे कमी पडलं तर इस्राइल-हमासची संघटना आहे, त्यांची गळाभेट घेतील. हिज्बुल, लश्कर ए तोयबा यांची भेट घेतील लाचारीसाठी. शिवसैनिक मेला काय जगला काय यांना काहीच घेणं-देणं नाही. मी आणि माझं कुटुंब, रुईकर यांच्यासाठी चालत निघाले होते तिरुपतीला...त्याचा मृत्यू झाला.सुमंत रुईकर या शिवसैनिकाच्या कुटुंबीयांच्या पाठिशी ठामपणे उभा राहिले. यांना काही देणंघेणं नाही. अशी अनेक उदाहरणं आहेत.

खुर्चीसाठी कधीही आम्ही तडजोड करणार नाही. म्हणून अब्दुल सत्तार आमच्यासमवेत आहेत. रक्ताचं नातं सांगणाऱ्यांनीच बाळासाहेबांच्या विचारांचा गळा घोटलाय. त्यांची बांधिलकी पैशाशी आहे. विचारांशी नाही. निर्लज्जपणाचे कळस गाठले. आपल्याला निवडणूक आयोगाने धनुष्यबाण आणि पक्ष दिल्यानंतर बँकेकडे शिवसेनेचे पैसे मागितले.

५० खोक्यांचे आरोप करता आणि ५० खोके आमच्याकडेच मागता

एकनाथ शिंदेंनी क्षणाचा विलंब न लावता ते द्यायला सांगितले. यांचे प्रेम फक्त पैशांवर आहे. बाळासाहेबांवर नाही. खोके त्यांना पुरत नाहीत. यांना कंटेनर पाहिजे. त्याचा साक्षीदार माझ्यापेक्षा दुसरा कोण असू शकतो. फक्त बोलत नाही. योग्य वेळेला बोलेल.

शिवाजी महाराजांना विसरले

गद्दार, महागद्दार....खरे खोकेबाज कोण...खरे महागद्दार कोण..यांनी बाळासाहेबांच्या विचारांशी, मतदारांशी गद्दारी केली....यांनी गद्दारी केली. शिवाजी महाराजांची वाघनखं लंडनहून आणण्याचा प्रयत्न केला. त्या वाघनखांवर संशय व्यक्त केला. शिवाजी महाराजांच्या शौर्यावर, अशा औलादी संशय घेऊ लागल्या. त्यांनी छत्रपती शिवरायांचा आदर्श सोडलाय. आणि अफजलखानाचा आदर्श स्वीकारलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कोल्हापुरातील वारणा धरणातून विसर्ग सुरू, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

कोणत्या देशात iPhone चा वापर सगळ्यात जास्त केला जातो? उत्तर वाचून बसेल धक्का

Maharashtra Politics : एकाची मराठीसाठी तळमळ, दुसऱ्याची खुर्चीसाठी मळमळ; एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंसाठी सॉफ्ट कॉर्नर

Eknath Shinde: दाढीवरून अर्धाच हात फिरवला, पूर्ण फिरवला असता तर...; ठाकरेंच्या पुष्पा स्टाइल टीकेवर एकनाथ शिंदेंचा पलटवार

Chocolate Brownie Recipe: स्नॅक्स टाइमसाठी झटपट बनवा माउथ वाटरिंग चॉकलेट ब्राउनी, नोट करा ही सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT